भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली (Vrat Kohli) याने आशिया चषक 2022 मध्ये धमाकेदार प्रदर्शन करून सर्वांचे लक्ष वेधले. विराटने तब्बल 1000 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय शतक केल. विराट क्रिकेटच्या मैदानाप्रमाणेच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. त्याने गुरुवारी (15 सप्टेंबर) स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला, जो चांगलाच व्हायरल झाल्याचे दिसते.
विराट कोहली (Vrat Kohli) या व्हिडिओत काही मजेशीर प्रश्नांची उत्तर देताना दिसत आहे. क्रिकेट भारतात सर्वात लोकप्रिय खेल आहे. भारतातील प्रत्येक गल्ली बोळांमध्ये लहान मुले क्रिकेट खेळताना दिसतात आणि त्यांचे काही खास शब्द देखील असतात, जे मैदानात खेळताना वापरले जातात. विराट देखील अशाच काही गोष्टीसंदर्भात प्रश्न विरारले गेले, ज्यावर त्याने स्वतःच्या खास शैलीमध्ये उत्तर देखील दिले आहे.
गल्ली क्रिकेटमध्ये खेळनारी मुले काही अशा शब्दांचा वापर करताना, ज्याचा अर्ध सर्वांनाच माहिती असतो. विराटला देखील या शब्दांचा अर्ध चांगल्या प्रकारे माहिती असल्याचे समोर आले. अधिकृत ट्वीटर खात्यावरून शेअर केल्या गेलेल्या या व्हिडिओत त्याला ‘बट्टा बॉल’ कशाला म्हणतात? असा प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना विराट म्हणाला की, गल्ली क्रिकेटमध्ये चकिंग (चुकीची गोलंदाजी) करणाऱ्या गोलंदाजांना बट्टा असे म्हटले जाते आहे. नंतर त्याला बेबी ओव्हस म्हणजे काय? अशा प्रश्नांची देखील योग्य उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. पूर्ण व्हिडिओत विराट चांगल्या मूडमध्ये आणि हसताना दिसत आहे. चाहते हा व्हिडिओ वेगाने व्हायरल करत आहेत. त्यावर प्रचंड लाईक्स आणि रिट्वीट येत आहेत.
How well do you know your cricket slangs? 🗣 @pumacricket#ad pic.twitter.com/yp5Ke6afpQ
— Virat Kohli (@imVkohli) September 15, 2022
विराटची लोकप्रियता जगजाहीर आहे. सोशल मीडियावर त्याला फॉलो करणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. काही दिवसांपूर्वीत त्याचे ट्वीटवरीर फॉलोअर्सने 5 कोटींचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारार तो जगातील पहिलाच क्रिकेटपटू बनला आहे. त्याने स्वतःचे ट्वीटर खाते 2009 साली सुरू केले होते आणि तो या माध्यामवर चांगलाच लोकप्रिय बनला आहे. तो या खात्यावरून नेहमीच सराव सत्रातील आणि जिममधील फोटो व्हिडिओ शेअर करत असतो. आशिया चषक 2022 मध्ये विराट त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शतक केल्यानंतर तब्बल दोन वर्ष आणि 10 महिन्यांना शतक केले. आशिया चषकात अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 122 धावा कुटल्या आणि शतकाचा हा दुष्काळ संपवला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाच्या ‘या’ माजी कसोटीपटूंचा जीवनप्रवास उलगडणार मुंबईमध्ये
दोन माजी कर्णधारांच्या करिअरची वाट लावतेय पाकिस्तान टीम! पाहा त्यांचा टी-20 वर्ल्डकपचा संघ
भारताचा अष्टपैलू लाईव्ह सामन्यात गंभीर जखमी, थेट स्टेडियमध्ये आणावी लागली ऍम्ब्युलन्स