भारतीय संघ विंडीज दौऱ्यासाठी सोमवारी(29 जूलै) रवाना झाला आहे. या दौऱ्याला 3 ऑगस्टपासून टी20 मालिकेने सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी रवाना होण्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला आहे. पण पत्रकार परिषदेला येण्यासाठी थोडा उशीर झाला असल्याने त्याने पत्रकारांची माफी मागितली.
मुंबईमध्ये ही पत्रकार परिषद संध्याकाळी 6 वाजता सुरु होणार होती. पण पत्रकार परिषद सुरु होण्यासाठी जवळजवळ अर्धातास उशीर झाला. याबद्दल विराटने पत्रकार परिषदेसाठी आल्यानंतर लगेचच माफी मागितली.
तो म्हणाला, ‘उशीर झाल्याबद्दल माफ करा. पाऊस खूप आहे ना त्यामुळे उशीर झाला.’
विराटसह या पत्रकार परिषदेसाठी भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीदेखील उपस्थित होते. यावेळी विराटने रोहित शर्माबरोबर कोणतेही वाद नसल्याचे स्पष्ट केले. याबरोबरच त्याने ड्रेसिंग रुममधील वातावरणही मैत्रीपूर्ण असल्याचे सांगितले आहे.
भारताच्या विंडीज दौऱ्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 3 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल ५५ वर्षांनी टीम इंडिया करणार पाकिस्तानचा दौरा
–रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाबद्दल कर्णधार विराट कोहली म्हणतो…






