---Advertisement---

एका कॅचमुळे खलनायक ठरलेल्या अर्शदीपची विराटकडून पाठराखण; म्हणाला, ‘दबावात कोणा…’

On: सोमवार, सप्टेंबर 5, 2022 12:00 PM
Virat-Kohli-Arshdeep-Singh
---Advertisement---

पाकिस्तानविरुद्धचा आशिया चषक 2022 मधील दुसरा सुपर-4 सामना भारताने 5 विकेट्सने गमावला. भारतीय संघाच्या या पराभवाचा सर्वात मोठा जबाबदार ठरला, युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग. अर्शदीपने गोलंदाजीत चांगले प्रदर्शन केले, परंतु मोक्याच्या क्षणी त्याने पाकिस्तानच्या फलंदाजांचा सोपा झेल सोडला आणि पराभवाचा खलनायक ठरला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर अर्शदीपवर भरपूर टीका होत आहे. मात्र माजी भारतीय कर्णधार विराट कोहली याने अर्शदीपची पाठराखण केली आहे.

अर्शदीपने (Arshdeep Singh) पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली (Asif Ali Catch) याचा सोपा आणि महत्त्वपूर्ण झेल सोडला. पाकिस्तानच्या डावातील अठराव्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर आसिफने साधारण फटका मारलो होता. यावेळी क्षेत्ररक्षक अर्शदीपकडे तो झेल टिपत आसिफला शून्य धावेवर परत पाठवण्याची संधी होती. परंतु अर्शदीपच्या (Arshdeep Singh) हातून तो सोपा झेल सुटला. त्यानंतर आसिफने 8 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने 16 धावा केल्या, ज्या पाकिस्तानच्या विजयासाठी महत्त्वपूर्ण ठरल्या.

याच कारणामुळे अर्शदीपवर टीका होत आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराटला अर्शदीपबद्दल प्रश्व विचारण्यात आला, ज्यावर विराटने अर्शदीपच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे.

विराट (Virat Kohli Supports Arshdeep Singh) म्हणाला की, “दबावात कोणाकडूनही अशी चूक होऊ शकते. हा खूप मोठा सामना होता, परिस्थितीही खूप दबावाची होती. मला आठवण आहे की, मी जेव्हा पाकिस्तानविरुद्ध चँपियन्स ट्रॉफी माझा पहिला सामना खेळला होता, तेव्हा मी खराब फटका खेळलो आणि बाद झालो होतो. दबावात कोणाकडूनही चुका होतात. याचे वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र भारतीय संघातील वातावरण खूप चांगले आहे. याचे सर्व श्रेय कर्णधार आणि संघ व्यवस्थापनाला जाते. त्यामुळे आपणच आपली चूक स्विकारली पाहिजे आणि पुन्हा एकदा दबावाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी तत्पर राहिले पाहिजे.”

भारतासाठी कठीण बनली अंतिम सामन्याची समीकरणे?
पाकिस्तानविरुद्धच्या सुपर-4 फेरीतील आपल्या पहिल्याच सामन्यातील पराभवानंतर भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. आता भारताला त्यांचे सुपर-4 फेरीतील दोन्हीच्या दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत. जर भारताने दोनपैकी एकही सामना गमावला, तर त्यांच्यावर आशिया चषकातून बाहेर होण्याची नामुष्की ओढावू शकते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-

धोनी, कोहलीने जे कमावलं, ते रोहितने झटक्यात गमावलं; 8 वर्षांनंतर पाकिस्तानने भारताला झुकवले
पाकिस्तानचा रडीचा डाव! ‘360 डिग्री’ सूर्यकुमारला उगाच डिवचलं, स्लेजिंगचा व्हिडिओ व्हायरल
वाढदिवस विशेष : कसोटी पदार्पणाच्या पहिल्या चेंडूवर बळी घेणारा ‘प्रज्ञान ओझा’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---