भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी (१६ सप्टेंबर) टी२० कर्णधारपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले. आगामी टी२० विश्वचषक ही त्याची कर्णधार म्हणून अखेरची स्पर्धा असेल. विराटच्या या निर्णयानंतर त्याच्या बाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा होताना दिसतोय. भारतीय संघाचा वरिष्ठ सलामीवीर शिखर धवनबाबतची एक घटना आता समोर आली आहे.
निवडकर्त्याची भांडला विराट
एका अग्रगण्य क्रिकेट संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, विराट कोहलीने शिखर धवनला भारतीय संघात स्थान देण्यासाठी निवड समिती सदस्यांशी वाद घातला होता. यावर्षीच्या सुरुवातीला इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर आला असताना, वनडे मालिकेसाठी शिखर धवनला संघात स्थान देण्यासाठी निवडकर्ते इच्छुक नव्हते. यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया मालिकेत धवनची कामगिरी सरासरी असल्याने, निवडकर्ते विजय हजारे ट्रॉफीमध्ये धावांचा रतीब घालणार्या पृथ्वी शॉ व देवदत्त पडिक्कल यांना संधी देऊ इच्छित होते. या दोघांनीही विजय हजारे ट्रॉफीत ८०० पेक्षा अधिक धावा झोडल्या होता.
यावेळी, विराटने निवड समितीच्या विरोधात जाऊन शिखर धवनची सलामीवीर म्हणून शिफारस केली. बऱ्याच वादविवादानंतर अखेरीस निवड समितीला माघार घ्यावी लागली व त्यांनी शिखराची संघात निवड केली.
धवनने सार्थ ठरवली निवड
इंग्लंडविरुद्ध निवड झाल्यानंतर शिखर धवनने आपल्या निवडीला न्याय दिला. पहिल्या सामन्यात धवनने ९८ धावा केल्या, तर दुसऱ्या सामन्यात तो केवळ ४ धावा केल्यावर बाद झाला. मात्र, तिसऱ्या सामन्यात त्याने पुन्हा ६७ धावांची खेळी खेळून विराट कोहलीचा निर्णय सार्थ ठरवला. परंतु, टी२० आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा फॉर्म तितका चांगला नव्हता, ज्यामुळे त्याला टी२० विश्वचषकासाठीच्या संघातून वगळण्यात आले. भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना धवनने नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यावर वनडे व टी२० मालिकेत संघाचे नेतृत्व केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
संजूच्या राजस्थान रॉयल्सला लिविंगस्टोन मिळवून देणार फायनलचं तिकीट! बजावेल महत्त्वाची भूमिका
आरसीबीच्या फलंदाजांच्या पहिल्या टप्प्यातील ३ ‘ब्लॉकब्लास्टर खेळी’, पडीक्कलचे नाबाद शतकही आहे यादीत