---Advertisement---

गुरू गंभीरच्या देखरेखीखाली विराटची 45 मिनिटे फलंदाजी, बुमराहनेही गोलंदाजीचा केला सराव

jasprit bumrah, virat kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला मायदेशात येत्या 19 सप्टेंबरपासून बांगलादेशविरुद्ध 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ही कसोटी मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 अंतर्गत खेळवली जाणार असल्याने दोन्ही संघांसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. ही मालिका जिंकत भारतीय संघ अंतिम सामन्यातील त्यांचा दावा मजबूत करू शकतो. तत्पूर्वी भारतीय खेळाडूंनी आठवडाभर आधीच मैदानावर सरावाला सुरुवात केली आहे.

लंडनहून परतल्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहली लगेचच चेन्नईत एमए चिदंबरम स्टेडियमवर सरावाला लागला आहे. कोहली तब्बल 8 महिन्यांनंतर कसोटीत पुनरागमन करत आहे. त्याने आपला शेवटचा कसोटी सामना जानेवारी 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊनमध्ये खेळला होता. प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यापूर्वी कोहलीने शुक्रवारी (13 सप्टेंबर) चेन्नईमध्ये 45 मिनिटे स्फोटक फलंदाजी केली.

तसेच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही सराव सत्रादरम्यान पूर्ण उत्साहात दिसला. यावेळी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी प्रशिक्षण सत्राची पाहणी केली. त्यांच्यासोबत सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक शर्मा आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल देखील सामील झाले होते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संपूर्ण 15 सदस्यीय संघ शुक्रवारी उपस्थित होता. वर्षांनंतर, भारताने देशांतर्गत हंगामापूर्वी आठवडाभराचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर अनेक भारतीय खेळाडू विश्रांतीवर होते. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा आदींचा समावेश आहे. अशा परिस्थितीत आता हे खेळाडू कसोटी क्रिकेटसाठी सज्ज झाले आहेत. दुसरीकडे, केएल राहुल, रिषभ पंत, कुलदीप यादव, शुभमन गिल आणि अक्षर पटेल दुलीप ट्रॉफीची पहिली फेरी खेळून चेन्नईला पोहोचले आहेत.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, आकाश. , जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

महत्त्वाच्या बातम्या-

द गोल्डन आर्म! शेवटच्या षटकात गोलंदाजीला आला अन् श्रेयसने पहिल्याच चेंडूवर काढली विकेट
येत्या काही तासातच भारत-पाकिस्तान संघात होणार अटीतटीची लढत, ‘इथे’ पाहा सामना
मायकल वॉनच्या मुलाची धमाल, 11 विकेट घेऊन एकहाती जिंकवला सामना!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---