विराट कोहलीनं बुधवारी (22 मे) आयपीएल 2024 च्या एलिमिनेटरमध्ये इतिहास रचला. तो आयपीएलमध्ये 8000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बनला आहे. त्यानं राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 29 धावा करताच आयपीएलमध्ये 8000 धावांचा टप्पा गाठला.
विराट कोहली 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून स्पर्धेचे सर्व हंगाम खेळला आहे. तो लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. विराट कोहलीनं आयपीएलमध्ये 252 सामन्यांमध्ये 8004 हून अधिक धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 38.67 आणि स्ट्राइक रेट 131.97 एवढा राहिला.
आयपीएलचा 17वा हंगाम संपणार आहे, मात्र कोहली व्यतिरिक्त अद्याप एकही फलंदाज 7000 धावांचा आकडा गाठू शकलेला नाही. विराट कोहलीनं अलीकडेच आरसीबीसाठी 250 वा सामना खेळला. आयपीएलमध्ये 250 सामने खेळणारा तो चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंह धोनी (264), रोहित शर्मा (257) आणि दिनेश कार्तिक (257) यांनी आयपीएलमध्ये एवढे सामने खेळले आहेत.
विराट कोहलीनं आयपीएल 2024 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. तो चालू हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. विराट कोहलीनं 15 सामन्यात 741 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 155.81 होता. आयपीएल 2024 मध्ये कोहलीच्या बॅटमधून 5 अर्धशतकं आणि 1 शतक निघालं आहे.
फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल 2024 मध्ये सलग 6 सामने जिंकून एलिमिनेटरमध्ये पोहोचला. मात्र राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या एलिमेनेटर सामन्यात विराट कोहली मोठी खेळी खेळू शकला नाही. तो 24 चेंडूत 33 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. आपल्या या खेळीत त्यानं 3 चौकार आणि 1 षटकार लगावला.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
विराट कोहली – 8004 धावा, 252 सामने
शिखर धवन – 6769 धावा, 222 सामने
डेव्हिड वॉर्नर – 6565 धावा, 184 सामने
रोहित शर्मा – 6628 धावा, 257 सामने
सुरेश रैना – 5528 धावा, 205 सामने
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल सुरु होण्यापूर्वी संजू सॅमसननं बदलला मोबाईल नंबर, सगळ्यांशी बोलणंही केलं बंद; काय आहे कारण?
एलिमिनेटर सामन्यात आरसीबी टॉस हारली, राजस्थानची गोलंदाजी; जाणून घ्या प्लेइंग 11
विराट कोहलीची प्ले-ऑफमधील आकडेवारी धक्कादायक! आरसीबीच्या चाहत्यांचा विश्वासच बसणार नाही