आयपीएल 2023 चा 20 वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. सलग दोन पराभवानंतर आरसीबी पुन्हा विजयी मार्गावर येण्यासाठी या सामन्यात उतरलेली. आपल्या होम ग्राउंडवर खेळताना आरसीबीचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने अर्धशतक केले. यासोबतच त्याने टी20 क्रिकेटमधील एक मोठा विक्रम आपल्या नावे केला.
नाणेफेक गमावल्यानंतर आरसीबीला प्रथम फलंदाजी करावी लागली. विराट कोहली आणि कर्णधार फाफ डू प्लेसिस यांनी संघाला वादळी सुरुवात मिळवून दिली. विराटने 50, तर डू प्लेसिसने 22 धावांची महत्वपूर्ण योगदान दिले. पहिल्या विकेटसाठी दोघांमध्ये 28 चेंडू 42 धावांची भागीदारी देखील पार पडली. विराटने 34 चेंडूवर 6 चौकार व एका षटकाराच्या मदतीने 50 धावा केल्या. विराटची बेंगलोर येथील चिन्नास्वामी स्टेडियमवरील टी20 मधील 25 वी 50 पेक्षा जास्त धावांची खेळी ठरली. यापूर्वी कोणत्याही खेळाडूने अशी कामगिरी केलेली नाही.
या मैदानावर विराटने टी20 मध्ये 22 अर्धशतके व 3 शतके झळकावली आहेत. याबाबतीत त्याने इंग्लंडचा फलंदाज ऍलेक्स हेल्स याला मागे टाकले. हेल्स याने इंग्लंडमधील ट्रेंट ब्रिज ठिकाणी 22 अर्धशतके व दोन शतके ठोकली आहेत.
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानी बांगलादेशचा अनुभवी सलामीवीर तमिम इक्बाल असून ढाका येथील शेर ए बांगला स्टेडियमवर त्याने 19 अर्धशतके व दोन शतके ठोकलीत. त्यानंतर इंग्लंडच्या जेसन रॉय याने ओव्हलच्या मैदानावर आतापर्यंत 19 अर्धशतकांसह दोन शतके झळकावली आहेत.
या सामन्यात बंगलोरच्या डावाचा विचार केल्यास चांगल्या सुरुवातीनंतर बंगलोरला अपेक्षित धावसंख्या उभारता आली नाही. विराटच्या अर्धशतकानंतर मॅक्सवेल याने 24 धावांची खेळी केली. मात्र, अनुज रावतच्या संथ खेळीने संघाचा डाव 200 पर्यंत जाऊ शकला नाही. शहाबाज अहमदने काही आक्रमक फटके खेळल्याने संघ 174 पर्यंत पोहोचू शकला.
(Virat Kohli Become First Batter In T20 Who Hits 25 50 Plus Score On Same Ground Virat Did At Chinnaswamy Stadium)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर बुमराह-श्रेयसच्या दुखापतीवर बीसीसीआयने दिले अपडेट, अशी आहे पुढील रणनीती
RCB vs DC । दिल्ली कॅपिटल्सने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा निर्णय, ‘अशी’ आहे प्लेइंग इलेव्हन