---Advertisement---

सामना पराभूत झाला असला तरी कोहली, डिविलियर्सने केले हे मोठे पराक्रम

On: शुक्रवार, मार्च 29, 2019 4:46 PM
---Advertisement---

बंगळूरु। गुरुवारी आयपीएल 2019 च्या मोसमातील सातवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईने 6 धावांनी विजय मिळवला.

पण या सामन्यात बेंगलोरकडून कडवी लढत देणाऱ्या कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी खास विक्रम केले आहेत.

या सामन्यात विराटने जेव्हा 46 वी धाव घेतली तेव्हा त्याने आयपीएलमध्ये 5000 धावांचा टप्पा पूर्ण केला. हा टप्पा पार करणारा तो सुरेश रैनानंतरचा दुसराच खेळाडू ठरला आहे. तसेच आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळताना 5000 धावांचा टप्पा गाठणारा विराट पहिला खेळाडू ठरला आहे.

गेले 12 वर्षे विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या एकाच संघाकडून खेळत आहे. तर रैना 2008 पासून 2015 पर्यंत चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. पण त्यानंतर चेन्नईवर दोन वर्षांची बंदी आल्याने 2016 आणि 2017 चा मोसम तो हा गुजरात लायन्स या संघाकडून खेळला आहे. त्यानंतर त्याला 2018 मध्ये पुन्हा चेन्नईने संघात कायम केले.

मात्र विराटने या विक्रमाला गवसणी घातल्यानंतर लगेचच मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्याला 46 धावांवरच बाद केले

त्याचबरोबर या सामन्यात नाबाद 70 धावांची तुफानी खेळी करणाऱ्या डिविलियर्सने आयपीएलमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला आहे. हा टप्पा पार करणारा तो एकूण 10 वा तर तिसरा परदेशी खेळा़डू ठरला.

यापूर्वी हा टप्पा डेव्हिड वॉर्नर आणि ख्रिस गेल या दोन परदेशी खेळाडूंनी पार केला आहे.

गुरुवारी झालेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 187 धावा करत बेंगलोरसमोर 188 धावांचे आव्हान ठेवले होते. पण बेंगलोरला 20 षटकात 5 बाद 181 धावाच करता आल्या.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

5032 धावा – सुरेश रैना (178 सामने)

5000 धावा – विराट कोहली (165 सामने)

4555 धावा – रोहित शर्मा (175 सामने)

4217 धावा – गौतम गंभीर (154 सामने)

4188 धावा – रॉबिन उथप्पा (167 सामने)

4152 धावा – शिखर धवन (145 सामने)

4099 धावा – डेव्हिड वॉर्नर (115 सामने)

4093 धावा – ख्रिस गेल (114 सामने)

4048 धावा – एमएस धोनी (177 सामने)

4032 धावा – एबी डिविलियर्स (143 सामने)

महत्त्वाच्या बातम्या – 

दिग्गज ऑलिंपियन मायकल फेल्प्स घेतोय रिषभ पंतकडून फलंदाजीचे धडे, पहा व्हिडिओ

आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने भारतीय सेनेसाठी उचलले मोठे पाऊल…

आयपीएल २०१९: दिल्लीच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सौरव गांगुलीने केली ‘दादा’ फलंदाजी, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment