---Advertisement---

दिग्गज ऑलिंपियन मायकल फेल्प्स घेतोय रिषभ पंतकडून फलंदाजीचे धडे, पहा व्हिडिओ

On: गुरूवार, मार्च 28, 2019 8:47 PM
---Advertisement---

भारताचा आणि दिल्ली कॅपिटल्सचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने काही दिवसांपूर्वी दिग्गज ऑलिंपियन मायकल फेल्प्सची भेट घेतली आहे. यावेळी त्याने या महान जलतरणपटूला क्रिकेटचे काही बारकावे देखील सांगितले आहेत.

फेल्प्सने ऑलिंपिकमध्ये जलतरणाच्या विविध प्रकारात 2004 ते 2016 या कालावधीत तब्बल 28 पदके जिंकली आहेत. यातील 23 तर सुवर्णपदकेच आहेत.

फेल्प्स काही दिवसांसाठी भारतात आला आहे. त्यामुळे त्याने भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटचे काही बारकावे शिकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने दिल्ली कॅपिटल्सच्या सरावादरम्यान खेळाडूंची भेट घेतली आहे.

यावेळी त्याने खेळाडूंबरोबर वेळ घालवत चर्चाही केली. तसेच त्याने पंतकडून फलंदाजी शिकण्याचाही प्रयत्न केला आणि काही फटके मारण्याचाही प्रयत्न केला. त्याचबरोबर त्याने खेळाडूंबरोबर फोटोही काढले. याचे फोटो आणि व्हिडिओ दिल्ली कॅपिटल्स संघाने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

दिल्ली संघाने आत्तापर्यंत या आयपीएल मोसमात दोन सामने खेळले आहेत. यातील मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात त्यांनी विजय मिळवला तर, चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

त्यांचा पुढील सामना शनिवारी(30 मार्च) कोलकता नाईट रायडर्स संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर- फिरोजशहा कोटला स्टेडियमवर होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

आयपीएल २०१९: मुंबई इंडियन्स विरुद्ध कोहलीने जिंकली नाणेफेक, असे आहेत ११ जणांचे संघ

आरसीबी आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनने भारतीय सेनेसाठी उचलले मोठे पाऊल…

आयपीएल २०१९: दिल्लीच्या ट्रेनिंग सेशनमध्ये सौरव गांगुलीने केली ‘दादा’ फलंदाजी, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment