नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 203 धावांनी मोठा विजय मिळवला.
या विजयाबरोबरच कर्णधार विराट कोहलीच्या नावावरही खास विक्रम झाला आहे. विराटचा हा कर्णधार म्हणून कसोटीतील 22 वा विजय आहे. यामुळे त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या 21 कसोटी विजयांचा विक्रम मागे टाकला आहे.
विराट आता कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर माजी कर्णधार एमएस धोनी आहे.
विराटने भारताचे आत्तापर्यंत 38 कसोटीत नेतृत्व केले असून यात 22 विजय आणि 7 पराभव स्विकारले आहेत. तसेच 9 सामने अनिर्णित राहिले आहेत.
त्याचबरोबर धोनीने 60 कसोटीत भारताचे नेतृत्व करताना 27 कसोटी सामने जिंकले आहे. तर गांगुलीने 49 कसोटीत नेतृत्व करताना 21 विजय मिळवले आहेत.
कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार
27 – एमएस धोनी
22 – विराट कोहली
21 – सौरव गांगुली#म #मराठी @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain— Pranali Kodre (@Pranali_k18) August 22, 2018
तसेच विराट हा इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात विजय मिळवणारा भारताचा सहावा कर्णधारही ठरला आहे.
इंग्लंडमध्ये कसोटीत विजय मिळवणारे भारतीय कर्णधार
1971 – वाडेकर
1986 – कपिल देव
1986 – कपिल देव
2002 – गांगुली
2007 – द्रविड
2014 – धोनी
2018 – विराट कोहली#म #मराठी @Maha_Sports @MarathiRT @MarathiBrain— Pranali Kodre (@Pranali_k18) August 22, 2018
विराटने या सामन्यात पहिल्या डावात 97 धावा आणि दुसऱ्या डावात 103 धावा केल्या आहेत. त्याला या सामन्यात सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. तो इंग्लंडमध्ये कसोटीत सामनावीर ठरलेला कपिल देव नंतरचा दुसराच कर्णधार ठरला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अखेर कोहलीच्या टीम इंडियाने तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला पाजले पाणी
–कसोटी सामन्यात संपुर्ण दिवसात टाकले गेले होते केवळ दोन चेंडू
–पाचव्या दिवशी १ विकेट बाकी असताना यापुर्वी १० सामन्यांत नक्की काय झाले होते?






