भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका शेवटच्या टप्प्यात आली आहे. मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जातोय. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ 191 धावांनी आघाडीवर आहे. भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज विराट कोहली याने मोठ्या कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने कसोटी क्रिकेटमधील काही विक्रम आपल्या नावे जमा केले.
या मालिकेत आतापर्यंत संघर्ष करत असलेल्या विराटने फलंदाजीला काहीशा अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर आपला दर्जा दाखवून दिला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या विराटने अतिशय शानदार खेळ करत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक ठरले. विशेष म्हणजे तब्बल 14 महिन्यानंतर तो अर्धशतक झळकावण्यात यशस्वी ठरला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी तो 59 धावांवर नाबाद आहे.
या खेळी दरम्यान भारतभूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा करणारा तो पाचवा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्यापूर्वी सुनील गावसकर,सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड व वीरेंद्र सेहवाग यांनी ही कामगिरी केली आहे. विराटने या विक्रमासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. विराटच्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 104 डावांमध्ये मिळून 4729 धावा झाल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायनलारा याचा 4714 धावांचा विक्रम मागे टाकला. या यादीमध्ये 6707 धावांसह भारतात सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानी आहे.
सामन्याचा विचार केला गेल्यास, ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दोन दिवसांवर वर्चस्व गाजवले होते. उस्मान ख्वाजाने 180 तर, कॅमेरून ग्रीन याने 114 धावांची खेळी केली होती. या दोघांच्या योगदानामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्य डावात 480 धावा उभ्या केल्या. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीय संघाकडून युवा सलामीवीर शुबमन गिल याने 128 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 3 बाद 289 धावा केल्या आहेत.
(Virat Kohli Becomes 2nd Successful Batter Against Australia With Handy Fifty)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“कसोटी क्रिकेट वाचवायच्या फक्त गप्पा मारू नका”, आयसीसीवर संतापला मॅथ्यूज, वाचा संपूर्ण प्रकरण
बापाचा खेळ पाहून हरखल्या पोरी! उस्मान ख्वाजाच्या चिमुरड्यांचा ‘क्युट’ फोटो व्हायरल