इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील चौथ्या दिवसानंतर (५ सप्टेंबर) भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर दोन मोठे विक्रम झाले आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या डावात विराट कोहली अवघ्या ४४ धावा करत माघारी परतला. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा गेल्या काही महिन्यांपासून शतक झळकावण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. चौथ्या कसोटी सामन्यात देखील शतकाची प्रतीक्षा संपवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु ४४ धावांवर फलंदाजी करत असताना त्याला मोईन अलीने ओव्हरटनच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले होते. या छोट्या खेळीत त्याने दोन मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
इंग्लंडमध्ये विराटचा मोठा कारनामा
वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या इंग्लडच्या खेळपट्टीवर फलंदाजांची खरी परीक्षा असते. याच खेळपट्ट्यांवर सर्वात जलद १ हजार कसोटी धावा पूर्ण करणारा विराट कोहली चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडमध्ये फलंदाजी २९ डावात १ हजार कसोटी धावांचा पल्ला गाठला आहे.
या यादीत सर्वोच्च स्थानी सचिन तेंडुलकर आहे. सचिनने इंग्लंडमध्ये १५ डावात १ हजार धावांचा पल्ला गाठला होता. तर, दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड आहे. राहुल द्रविडने १६ डावात १ हजार धावा करण्याचा पराक्रम केला होता. तर सुनील गावसकरांनी हा कारनामा २३ डावात केला होता.(Virat Kohli becomes 4th Indian to score 1000 runs in England)
असा कारनामा करणारा विराट ठरला चौथा फलंदाज
विराटने ओव्हलच्या मैदानावर ४४ धावा करत इंग्लंडमध्ये १००० धावा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. असा कारनामा करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. या यादीत सर्वोच्च स्थानी सचिन तेंडुलकर आहे. सचिनने इंग्लंडमध्ये सर्वाधिक १५७५ धावा केल्या आहेत. तर राहुल द्रविडने इंग्लंडमध्ये १३७६ धावा केल्या आहेत. तसेच सुनील गावसकर यांनी इंग्लंडमध्ये ११५२ धावा केल्या आहेत.
इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१५७५ धावा – सचिन तेंडुलकर
१३७६ धावा – राहुल द्रविड
११५२ धावा – सुनील गावसकर
१००२ धावा – विराट कोहली*
९६० धावा – दिलीप वेंगसरकर
९१५ धावा – सौरव गांगुली
महत्त्वाच्या बातम्या –
मस्ती टाइम! दुसऱ्या डावात पुजाराचा चांगला स्ट्राइक रेट पाहून रोहितने उडवली खिल्ली, पाहा व्हिडिओ
वेलकम होम मॅगी!! जोस बटलर दुसऱ्यांदा झाला ‘बाबा’, पाहा क्यूट फोटो