भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानात जसे नव-नवे विक्रम करत असतो. तसेच तो मैदानाबाहेरही करत आहे. त्याचे जगभरात करोडो चाहते आहेत. हे चाहते विराटला सोशल मीडियावरही फॉलो करत असतात. विराटचे नुकतेच इंस्टाग्रामवर 50 मिलियन (5 कोटी) फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत.
त्यामुळे इंस्टाग्रामवर 50 मिलियन फोलोवर्स असणारा विराट पहिला भारतीय व्यक्ती ठरला आहे.
जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असणाऱ्या विराटने आत्तापर्यंत इंस्टाग्रामवर 932 पोस्ट केल्या असून तो 148 अकाउंट्सला फॉलो करतो.

भारतीयांमध्ये विराट पाठोपाठ इंस्टाग्रामवर सर्वाधिक फोलोवर्स असणाऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर प्रियंका चोप्रा आहे. तिला 49.9 फोलोवर्स आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर 44.1 फोलोवर्ससह दिपिका पदुकोण आहे.
जूलै 2019मध्ये इंस्टाग्राम शेड्यूलिंग टूल होपर एचक्यू के च्या नुसार इंस्टाग्रामच्या एका पोस्टमधून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट 9 व्या क्रमांकावर होता. त्यावेळीच्या आकडेवारीनुसार त्याची एका इंस्टाग्रामच्या एका पोस्टमधून 1 लाख 96 हजार यूएस डॉलर्स(साधारण 1 कोटी 35 लाख 66 हजार रुपये) इतकी कमाई होती.
याबरोबरच सध्या जागतिक पातळीवर इंस्टाग्रामवर सर्वाधिक फोलोवर्स असणाऱ्यांमध्ये अव्वल क्रमांकावर दिग्गज पोर्तुगीज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. रोनाल्डोला सध्या 204 मिलियन फोलोवर्स आहेत. तर त्याच्यापाठोपाठ 175 फोलोवर्ससह संगीतकार एरियाना ग्रँड दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकावर हॉलिवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन आहे. त्याला 172 फोलोवर्स आहेत.






