केकेआर विरुद्धच्या आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने इतिहास रचला. हा सामना विराट कोहलीच्या टी 20 कारकिर्दीतील 400 वा सामना होता, ज्यामध्ये त्याने नाबाद (59) अर्धशतकी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर आरसीबी संघाने एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यांत कृणाल पांड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. पण विराट कोहलीची ही खेळी पाहता त्याला प्लेअर ऑफ द डे खेळाडू म्हणणे वावगे ठरणार नाही.
विराट कोहलीने सामन्यात 38 धावा करताच त्याचे नाव इतिहासाच्या पानांवर नोंदवले गेले. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध 1000 धावा पूर्ण करणारा किंग कोहली आयपीएलच्या इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला.
आयपीएलमध्ये 4 वेगवेगळ्या संघांविरुद्ध 1000 धावा करणारा कोहली एकमेव क्रिकेटपटू बनला आहे. 2008 मध्ये आयपीएल सुरू झाल्यापासून विराट कोहली आरसीबीचा भाग आहे. विराट कोहलीने 34 सामन्यांमध्ये केकेआरविरुद्ध 932 धावा केल्या आहेत, तर एकूण विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर केकेआर विरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विराट कोहलीने 1000 धावांचा टप्पा गाठला.
या सामन्यात आरसीबीने फक्त 16.2 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला, जो आयपीएलच्या इतिहासात 175 किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेंडूंच्या बाबतीत त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.





