यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पहिला सेमीफायनल सामना आज (4 मार्च) (India vs Australia Semifilanl 1) संघात दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगला आहे. यादरम्यान भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक विराट कोहलीने (Virat Kohli) एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारा भारतीय क्षेत्ररक्षक बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध कोहलीने जोश इंग्लिशचा झेल घेऊन हा विक्रम केला. हा कोहलीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 335वा झेल होता. याआधी हा विक्रम माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नावावर होता. द्रविडने 334 झेल घेतले. याशिवाय, द्रविडने यष्टीरक्षक म्हणून 72 झेल घेतले. (Virat Kohli becomes the highest-catching player for India in International Cricket)
या सामन्यापूर्वी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 121, वनडे सामन्यात 159 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 54 झेल घेतले होते. कोहलीने अलिकडेच मोहम्मद अझरुद्दीनचा वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम मोडला होता आणि या फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक झेल घेणारा क्षेत्ररक्षक बनला. अझरूद्दीनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 261 झेल घेतले होते.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकांमध्ये सचिन तेंडुलकर चौथ्या स्थानावर आहे. ज्याने 256 झेल घेतले.सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा नाणेफेक जिंकण्यात अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वृत्त लिहिपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 4 बाद 178 अशी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मोहम्मद रिजवानचा पत्ता कट, पाकिस्तानच्या कर्णधारपदी सलमान आगाची नियुक्ती
IND vs AUS; भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं
क्रिकेटमध्ये असं दुर्भाग्य कुणाचंच नसेल! रोहितच्या नावावर नकोसा विक्रम





