सोमवारी वयाच्या 84 व्या वर्षी शिवलकर यांचे निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) हा निर्णय घेतला. बीसीसीआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत माहिती दिली की, “दिवंगत श्री. पद्माकर शिवलकर यांच्या सन्मानार्थ, टीम इंडिया आज हातावर काळ्या पट्टी बांधत आहे.”
In honour of the late Shri Padmakar Shivalkar, Team India is wearing black armbands today.
— BCCI (@BCCI) March 4, 2025
मुंबईच्या दिग्गज फिरकीपटू पद्माकर शिवलकर यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 84व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक उत्कृष्ट फिरकीपटू म्हणून त्यांचे नाव घेतले जात असे, मात्र दुर्दैवाने त्यांना राष्ट्रीय संघात खेळण्याची संधी कधीच मिळाली नाही. तरीही, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी आपल्या अप्रतिम कामगिरीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली असून अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
पद्माकर शिवलकर यांनी आपल्या कारकिर्दीत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 124 सामन्यांत 19.74 च्या प्रभावी गोलंदाजी सरासरीने 589 बळी मिळवले. मुंबईसाठी खेळताना रणजी ट्रॉफीतील त्यांच्या जबरदस्त कामगिरीमुळे संघाने सलग 15 वेळा विजेतेपद पटकावले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) 2017 मध्ये शिवलकर यांना कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. त्यांच्या क्रिकेटमधील योगदानाची दखल घेत हा प्रतिष्ठित पुरस्कार देण्यात आला होता. (Padmakar Shivalkar first-class records)
हेही वाचा-
क्रिकेटमध्ये असं दुर्भाग्य कुणाचंच नसेल! रोहितच्या नावावर नकोसा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यापूर्वी भारताच्या विजयासाठी वाराणसीत हवन, काशीच्या घाटांवर महाआरती
भारतीय संघाला फायनल मध्ये पोहोचवू शकतात हे तीन खेळाडू, कोण ते जाणून घ्या एका क्लिकवर






