भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (INDvsAUS) यांच्यात रविवारी (25 सप्टेंबर) तिसरा टी20 सामना खेळला गेला. हैद्राबाद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेट्सने पराभव केला. यावेळी भारताच्या फलंदाजांनी विजयामध्ये महत्वाची भुमिका पार पाडली. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या. प्रत्युत्तरात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी अर्धशतके केली. उत्तम खेळी करताना विराटने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
भारताच्या मध्यम फळीतील विश्वासाचा फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने 131.25च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. त्याने 48 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचत 63 धावा केल्या. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा विक्रम केला आहे. तो मर्यादीत षटकांच्या सामन्यांमध्ये 16000 पेक्षा अधिक धावा करणारा केवळ दुसराच फलंदाज ठरला आहे.
विराटने आंतरराष्ट्रीय टी20 आणि वनडे मिळून 16004 धावा केल्या आहेत. त्याने मर्यादीत षटकांच्या 369 सामन्यांतील 352 डावांमध्ये खेळताना 55.95च्या सरासरीने सोळा हजारांचा टप्पा गाठला आहे. यामध्ये त्याने 44 शतके आणि 97 अर्धशतके केली आहेत.
विराटने 262 वनडेमध्ये 57.68च्या सरासरीने 12344 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 43 शतके आणि 64 अर्धशतकांचा समावेश आहे. तर 107 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 50.83च्या सरासरीने 3660 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे.
मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये (व्हाईट बॉल) सोळा हजारांचा टप्पा भारताचा दिग्गज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) यानेच गाठला आहे. त्याने 464 सामन्यांमध्ये 18436 धावा केल्या आहेत. यामध्ये 463 वनडे आणि एकच टी20 सामना खेळला आहेत. वनडेमध्ये त्याने 44.83च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. यामध्ये 49 शतके आणि 96 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी20मध्ये 10 धावा केल्या आहेत.
विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याच्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. त्यांंनी 62 चेंडूत 104 धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारने 36 चेंडूत 69 धावा केल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नुकसान! आयसीसी रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर
INDvsAUS: विराट-रोहितचे भन्नाट सेलेब्रेशन, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
INDvsAUS: ‘किंग कोहली’ने पार केली ‘द वॉल’! फिफ्टी करताच केला ‘हा’ मोठा पराक्रम नावावर