भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जाणार आहे. बुधवारी (1 मार्च) सुरू होत असलेल्या या सामन्यामध्ये विजय मिळवत मालिका आपल्या नावे करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल. मात्र, या सामन्याआधी भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली हा संघाचा क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनला. तो खेळाडूंना सराव देत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने नागपूर व दिल्ली येथील सामने आपल्या नावे केले होते. इंदोर कसोटी जिंकल्यास भारतीय संघाला एकाच वेळी तीन फायदे होणार आहेत. या विजयासह भारतीय संघ मालिका आपल्या नावे करेल. तसेच जागतिक कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानी येईल. याव्यतिरिक्त या विजयासह भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही स्थान मिळणार आहे. या महत्त्वाच्या सामन्याआधी विराट खेळाडूंचा क्षेत्ररक्षणाचा सराव घेताना दिसून आला.
Virat Kohli – the fielding coach. pic.twitter.com/EtSdWjgebM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 28, 2023
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, विराट हा क्षेत्ररक्षण प्रशिक्षकाप्रमाणे खेळाडूंना झेलाचा सराव करवताना दिसतोय. श्रेयस अय्यर, शुबमन गिल व सूर्यकुमार यादव हे जेल घेताना दिसत आहेत. दिल्ली व नागपूर येथील कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाकडून काही झेल स्लीपमध्ये सुटले होते. स्वतः विराटकडून काही चुका झालेल्या. स्लीपमधील भारताच्या क्षेत्ररक्षणावर काही माजी खेळाडूंनी टीका देखील केलेली.
इंदोर कसोटीसाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव व मोहम्मद सिराज.
इंदोर कसोटीसाठी संभाव्य ऑस्ट्रेलिया संघ-
उस्मान ख्वाजा, ट्रेविस हेड, मार्नस लॅब्युशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, पीटर हॅंड्सकॉम्ब, ऍलेक्स केरी, मिचेल स्टार्क, नॅथन लायन, टॉड मर्फी व लान्स मॉरिस.
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीत विराट करणार खास क्लबमध्ये एन्ट्री! यापूर्वी भारताकडून फक्त द्रविडच मानकरी
बुमराहचे पुनरागमन सप्टेंबरपर्यंत लांबणार! कारकीर्दीविषयी आता बीसीसीआय घेणार कठोर निर्णय