अॅडलेड। भारताचा आॅस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी(8 डिसेंबर) 235 धावांवर संपुष्टात आला आहे. त्यामुळे भारताने 15 धावांची आघाडी घेतली आहे.
या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने खास विक्रम केला आहे. त्याने जेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 5 वी धाव काढली तेव्हा त्याने आॅस्ट्रेलियन भूमीत 1000 कसोटी धावाही पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे.
तसेच तो आॅस्ट्रेलियामध्ये कसोटीत सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम त्याचा 9 वा कसोटी सामना खेळताना 18 व्या डावात केला आहे.
याआधी हा विक्रम व्हिव्हिएस लक्ष्मणच्या नावावर होता. त्याने 19 डावात आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीत 1000 धावा केल्या होत्या. त्याच्या पाठोपाठ सचिन तेंडूलकर आहे. त्याने 22 डावात आॅस्ट्रेलियामध्ये 1000 कसोटी धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर विरेंद्र सेहवागनेही आॅस्ट्रेलियामध्ये कसोटीत 1000 धावा 22 डावातच पूर्ण केल्या आहेत. पण त्याने भारताकडून आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी खेळताना कसोटीत 948 धावा केल्या आहेत. तसेच आयसीसी विश्वएकादश संघाकडून आॅस्ट्रेलियामध्ये 1 कसोटी सामना खेळताना 83 धावा केल्या आहेत. अशा मिळून त्याने आॅस्ट्रेलियामध्ये 1031 कसोटी धावा केल्या आहेत.
कोहली हा भारताकडून आॅस्ट्रेलियामध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध 1000 कसोटी धावा पूर्ण करणारा केवळ चौथाच खेळाडू ठरला आहे तर एकूण 28 वा खेळाडू ठरला आहे.
याआधी भारताकडून सचिन तेंडुलकर(1809), व्हिव्हिएस लक्ष्मण(1236) आणि राहुल द्रविड(1143) यांनी आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये 1000 कसोटी धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर विराट कोहलीने आॅस्ट्रेलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावाही पूर्ण केल्या आहेत.
आज दुसऱ्या सत्रात भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात झाली. भारताकडून मुरली विजय आणि केएल राहुल यांनी सलामीला चांगली सुरुवात केली होती. पण चांगल्या सुरुवातीनंतरही विजय 18 धावांवर बाद झाला. तर काही वेळाने राहुल 44 धावा करुन बाद झाला.
🙌 1⃣0⃣0⃣0⃣ 🙌
Congratulations to @imVkohli on completing 1000 Test runs in Australia!
Follow #AUSvIND action live 👇https://t.co/sCMk42uzZC pic.twitter.com/wIzvAU1SiB
— ICC (@ICC) December 8, 2018
आॅस्ट्रेलियामध्ये कसोटीत सर्वात जलद 1000 धावा करणारे भारतीय फलंदाज-
18 डाव – विराट कोहली
19 डाव – व्हिव्हिएस लक्ष्मण
22 डाव – सचिन तेंडुलकर /विरेंद्र सेहवाग
25 डाव – राहुल द्रविड