इंडियन प्रीमियर लीग २०२२ ची रणधुमाळी सुरू झाली असून आतापर्यंत ३ सामने पार पडले आहेत. यातील तिसरा सामना रविवारी (२७ मार्च) पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. बेंगलोरने ५ विकेट्स राखून हा सामना गमावला. प्रथम फलंदाजी करताना बेंगलोरने २० षटकांमध्ये २ बाद २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल पंजाबने १९ षटकांमध्येच ५ विकेट्स गमावत बेंगलोरचे आव्हान पूर्ण केले आणि ५ विकेट्सने सामना खिशात घातला. या सामन्यादरम्यान बेंगलोरचा स्टार फलंदाज विराट कोहली याने धडाकेबाज खेळी करत मोठा विक्रम केला आहे.
मागील बऱ्याच वर्षांपासून सातत्यपूर्ण चांगले फलंदाजी प्रदर्शन करण्यात अपयशी ठरत असलेल्या विराटने (Virat Kohli) या सामन्यात जबरदस्त खेळ दाखवला. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत २९ चेंडूंमध्ये २ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४१ धावा केल्या. या शानदार खेळीसह विराट टी२० क्रिकेट (ट्वेंटी-ट्वेंटी) मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या (Most Runs In T20 Cricket) पहिल्या ५ फलंदाजांच्या यादीत पोहोचला आहे.
विराटने वॉर्नरला टाकले मागे
विराटने आतापर्यंत ३२७ टी२० सामने खेळताना १०३१४ धावा फटकावल्या आहेत. यासह त्याने टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाचव्या स्थानी उडी घेतली आहे. त्याने याबाबतीत ऑस्ट्रेलियाच्या डेविड वॉर्नरला मागे सोडले आहे. वॉर्नर ३१३ टी२० सामन्यांमध्ये १०३०८ धावांसह सहाव्या क्रमांकावर घसरला आहे.
या विक्रमात विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. त्याने त्याने ४६३ सामने खेळताना १४५६२ धावा केल्या आहेत. टी२० क्रिकेटमध्ये गेलची सर्वोच्च वैयक्तिक खेळी नाबाद १७५ धावा इतकी राहिली आहे. पाकिस्तानचा शोएब मलिक ११६९८ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर अनुक्रमे कायरन पोलार्ड (११४३० धावा) आणि ऍरॉन फिंच (१०४४४ धावा) आहेत.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा-
ख्रिस गेल – १४५६२ धावा
शोएब मलिक – ११६९८ धावा
कायरन पोलार्ड – ११४३० धावा
ऍरॉन फिंच – १०४४४ धावा
विराट कोहली – १०३१४ धावा
डेविड वॉर्नर – १०३०८ धावा
महत्त्वाच्या बातम्या-
WI vs Eng| वेस्ट इंडीजकडून इंग्लंडला तब्बल १० विकेट्सने पराभवाचा दणका, मालिकेवरही कब्जा
काय आहे कसोटी सामन्यातील सर्वात कमी स्कोर? ‘या’ संघाला ३० धावाही करता आल्या नव्हत्या
RCBvsPBKS : बेंगलोरने फलकावर लावल्या २०५ धावा अन् तिथेच निश्चित झाला पराभव, वाचा सविस्तर