सिडनी। भारताचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज(7 जानेवारी) पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची चार सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे.
याबरोबरच पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका ऑस्ट्रेलियन भूमीत जिंकण्याचा इतिहास रचला आहे.
त्याचबरोबर भारत हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई संघ ठरला आहे. तसेच भारताचा कर्णधार विराट हा ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.
आत्तापर्यंत 71 वर्षांत 29 आशियाई कर्णधार ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी सामने खेळले आहेत. त्यातील फक्त विराट कोहलीला ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्यात यश आले आहे.
भारताची ऑस्ट्रेलियन भूमीतील ही 12 वी कसोटी मालिका होती. मागील 11 कसोटी मालिकांपैकी भारताने 8 मालिकांमध्ये पराभव स्विकारला आहे तर 3 मालिकांमध्ये बरोबरी केली आहे.
त्याचबरोबर भारत ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिका जिंकणारा एकूण पाचवा संघ ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियन भूमीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम इंग्लंड, विंडीज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघानी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–कोहलीची टीम इंडिया असा भीमपराक्रम करणारा बनला जगातील पाचवाच संघ
–आयपीएलमध्ये जागा न मिळालेल्या खेळाडूचा शतकातील सर्वोत्तम झेल घेण्याचा प्रयत्न, पहा व्हिडिओ