विश्वचषक 2023 सुरू झाल्यापासून विराट कोहली () अधिकच आक्रामक झाल्याचे दिसत आहे. रविवारी (22 ऑक्टोबर) विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात देखील अशीच खेळी केली. विरटाने 60 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान विराटने आयसीसी मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये आपल्या 3000 धावा पूर्ण केल्या.
आयसीसी मर्यादित षटकांच्या स्पर्धांमध्ये वनडे विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन स्पर्धांचा समावेश होतो. विराटने या तिन्ही स्पर्धांमध्ये मिळून रविवारी आपल्या 3000 धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा विराट कोहली पहिलाच क्रिकेटपटू आहे. या तीन स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराट पहिल्या क्रमांकावर असून दुसरा क्रमांक ख्रिस गेल याचा आहे. वेस्ट इंडीजच्या या माजी दिग्गजाच्या नावापुढे 2942 धावांची नोंद आहे.
तिसरा क्रमांक माजी श्रीलंकन कर्णधार कुमार संगकारा () याचा आहे, ज्याने 2876 धावा केल्या आहेत. 2858 धावांसह माहेला जयवर्धने चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या भारताचे कर्णधारपद सांभाळणारा रोहित शर्मा 2733 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावर भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आहे. सचिनने या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये एखून 2719 धावा केल्या आहेत.
मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज (वनडे विश्वचषक+चॅम्पियन्स ट्रॉफी+टी-20 विश्वचषक)
3000+ -विराट कोहली (भारत)
2942 – ख्रिस केल (वेस्ट इंडीज)
2876 – कुमार संगकारा (श्रीलंका)
2858 – माहेला यजवर्धने (श्रीलंका)
2733 – रोहित शर्मा (भारत)
2719 – सचिन तेंडुलकर (भारत)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर नजर टाकली, तर नाणेफेक जिंकून पाहुण्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डावातील शेवटच्या चेंडूवर न्यूझीलंड संघ 275 धावा करून शेवटची विकेट गमावली. डॅरिल मिचेल याने 130, तर रचिन रविंद्र याने 75 धावांची अप्रतिम खेळी केली. भारतासाठी मोहम्मद शमी याने अप्रतिम गोलंदाजी करत 5 विकेट्स नावावर केली. (Virat Kohli becomes the first player to complete 3000 runs in ICC limited over cricket tournaments)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड- डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
प्रिन्स ऑन टॉप! एकाच वेळी चार मातब्बरांना मागे सोडत केला नवा विक्रम
कोणत्याच दिग्गजाला न जमलेली कामगिरी शमीला जमली, विश्वचषकातील खास विक्रम वेगवान गोलंदाजाच्या नावावर