शेख जायद स्टेडियममध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसरा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने-सामने होते. या सामन्यात कर्णधार विराट कोहली मोठी खेळी खेळणार अशी आशा व्यक्त गेली होती. परंतु, तो अवघ्या ५ धावा करत माघारी परतला. तरीदेखील त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेली अनेक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच गेल्या ८ वर्षांपासून तो या संघाचे नेतृत्व करतोय. दरम्यान कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेला सामना हा त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघासाठी २०० वा सामना आहे.
त्यामुळे आयपीएलमध्ये एकाच संघासाठी २०० सामने खेळणारा विराट पहिलाच खेळाडू ठरला आहे. विराट कोहलीच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. स्पर्धेच्या पहिल्याच हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर फ्रेंचायजीने विराट कोहलीवर विश्वास दाखवत आपल्या संघात स्थान दिले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत हा विश्वास टिकून आहे.
विराट कोहली नंतर या यादीत एमएस धोनीचा समावेश आहे. एमएस धोनीने या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि रायसिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्स संघासाठी एकूण १८२ सामने खेळले आहेत. तर सुरेश रैनाने देखील चेन्नई सुपर किंग्स संघासाठी १७२ सामने खेळले आहेत. तर मुंबई इंडियन्स संघाचा विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्ड याने मुंबई इंडियन्स संघासाठी एकूण १७२ सामने खेळले आहेत. तसेच मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघासाठी १६२ सामने खेळले आहेत.
आयपीएल स्पर्धेत एकाच फ्रेंचायजीसाठी सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू
विराट कोहली -२०० सामने ( आरसीबी)*
एमएस धोनी – १८२ सामने (सीएसके)
सुरेश रैना – १७२ सामने (सीएसके)
कायरोन पोलार्ड – १७२ सामने (मुंबई इंडियन्स)
रोहित शर्मा – १६२ सामने (मुंबई इंडियन्स)
महत्त्वाच्या बातम्या –
कोहली अन् केकेआर @२००! बेंगलोर विरुद्ध कोलकाता सामना सुरु होताच झाले २ मोठे विक्रम
टीम इंडिया २०२१-२२ मध्ये मायदेशात खेळणार तब्बल १४ टी२०, ४ कसोटी अन् ३ वनडे, पाहा संपूर्ण वेळापत्रक