टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022 मध्ये रविवारी (23 ऑक्टोबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे सामना खेळला गेला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला हा सामना भारताने 4 विकेट्सने जिंकला. भारताच्या या विजयाचा विराट कोहली शिल्पकार ठरला. जेव्हा जेव्हा त्याने धावा केल्या तेव्हा तेव्हा त्याने अनेक विक्रमे रचली आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही त्याने विश्वचषकाच्या इतिहासातील मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
भारताचा स्फोटक आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा विराट कोहली (Virat Kohli) याने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली. विराटने मर्यादित षटकांच्या आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतके (24) तर केलीचं पण त्याने आणखी एक विक्रम केला. क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये एकाच संघाविरूद्ध 500 धावांचा टप्पा गाठणारा विराट हा पहिलाच खेळाडू बनला आहे. त्याने विश्वचषकात पाकिस्तान विरूद्ध 501 धावा केल्या.
विराटच्या आधी हा विक्रम दक्षिण अफ्रिकेच्या एबी डिविलियर्स (AB De Villiers) याच्या नावावर होता. डिविलियर्सने विश्वचषकात वेस्ट इंडीज विरूद्ध 458 धावा केल्या. या यादीत श्रीलंकेचा माहेला जयवर्धने याचा तिसरा क्रमांक लागतो. जयवर्धनेने विश्वचषकात न्यूझीलंड विरूद्ध 424 धावा केल्या.
तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानी संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. सुरुवातीला बसलेल्या धक्क्यांनी सावरल्यानंतर इफ्तिखार अहमद आणि शान मसूद यांच्या झुंझार खेळाच्या जोरावर पाकिस्तानने 20 षटकात 8 विकेट्स गमावत 159 धावांपर्यंत मजल मारली. इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) याने या डावात 34 चेंडूत 2 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांच्या जोरावर 51 धावा केल्या. त्याला शान मसूद (Shan Masood) याने देखील उत्तम साथ दिली. त्याने 42 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने नाबाद 52 धावा केल्या. यावेळी भारताच्या गोलंदाजीत हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स घेतल्या.
159 धावसंख्येच आव्हान मोडीत काढण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात देखील निराशाजनक झाली. केएल राहुल आणि रोहित शर्मा झटपट बाद झाल्यानंतर भारताचा डाव डगमगला. मात्र, कोहली-पांड्या यांनी केलेली विस्फोटक फलंदाजी बघून सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. विराटने शेवटपर्यंत भारताची खिंड लढवली. त्याने 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने नाबाद 82 धावा केल्या.
क्रिकेटच्या सर्व प्रकारच्या विश्वचषक स्पर्धांमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
501 – विराट कोहली वि. पाकिस्तान
458 – एबी डिविलियर्स वि. वेस्ट इंडिज
424 – माहेला जयवर्धने वि. न्यूझीलंड
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शांत द्रविडचे भन्नाट सेलेब्रेशन! आयसीसीने शेयर केलायं व्हिडिओ, एकदा पाहाच
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 3 विकेट्सनंतर भारताने जोडल्या ‘एवढ्या’ धावा अन् रचला विक्रम, नजर तर टाकाच