नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 48.2 षटकात सर्वबाद 250 धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी 251 धावांचे आव्हान ठेवले आहे.
या सामन्यात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी करत भारताचा डाव सांभाळला. त्याने 120 चेंडूत 116 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 10 चौकार मारले. त्याला 48 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पॅट कमिन्सने बाद केले.
विराटचे हे वनडे क्रिकेटमधील 40 वे शतक ठरले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धचे वनडेमधील सातवे शतक आहे. त्यामुळे विराट तीन संघांविरुद्ध वनडेमध्ये 7 किंवा त्यापेक्षा अधिक शतके करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याने वनडेमध्ये श्रीलंका विरुद्ध आठ, विंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध प्रत्येकी सात शतके केली आहेत.
याबरोबरच विराटने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. रोहितनेही ऑस्ट्रेलिया विरुद्ध सात वनडे शतके केली आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर सचिन तेंडुलकर आहे. सचिनने वनडेमध्ये 9 शतके ऑस्ट्रेलिया विरुद्ध केली आहेत.
कोहलीची ४० वनडे शतकं-
८- श्रीलंका
७- विंडीज
७- ऑस्ट्रेलिया
५- न्यूझीलंड
४- दक्षिण आफ्रिका
३- इंग्लंड
३- बांगलादेश
२- पाकिस्तान
१- झिंबाब्वे#म #मराठी #INDvsAUS #Indvaus #Nagpur #Vidarbha #ViratKohli— Sharad Bodage (@SharadBodage) March 5, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–२२४व्या वनडेत रनमशीन विराट कोहलीने केले १५ पराक्रम
–तेंडुलकरपेक्षा तब्बल १३९ डाव कमी खेळत किंग कोहलीने केला तो खास पराक्रम
–तेंडुलकर, कपिल देव नंतर असा कारनामा करणारा जडेजा तिसराच भारतीय