---Advertisement---

विराट कोहलीने धोनीबद्दल केलेला ‘तो’ ट्वीट सोशल मीडियावर हिट!

On: मंगळवार, डिसेंबर 10, 2019 7:57 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) आतापर्यंत अनेक विक्रम केले आहेत. क्रिकेटच्या मैदानावर विराटने त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीने सर्व क्रिकेट जगताला वेड लावले आहे.

ज्याप्रकारे विराटने 2019 या वर्षात मैदानावर अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे, तसेच त्याने आता मैदानाबाहेरही एक खास विक्रम केला आहे.

विराटने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या (MS Dhoni) वाढदिवशी एक ट्वीट केले होते. ते ट्वीट आता क्रीडाजगतातील सर्वाधिक रिट्विट करण्यात आलेले ट्वीट (Most retweeted Tweet) ठरले आहे.

कोहलीने धोनीच्या वाढदिवसानिमित्त दोघे सोबत असलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला होता. तसेच ट्वीट केले होते की ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई. खूप कमी लोक आहेत, जे विश्वास आणि आदर याचा अर्थ समजतात आणि मला आनंद आहे मागील अनेक वर्षांपासून माझी तूझ्याशी मैत्री आहे. तू आमच्या सर्वांसाठी मोठा भाऊ आहे आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे तू नेहमी माझा कर्णधार असशील.’

विराटचा हा ट्वीट अनेक क्रीडाचाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. त्यामुळे या ट्विटला अनेक रिट्विटही आले आहेत.

विराटने ट्वीट केल्यानंतर ही पोस्ट 46.3k वेळा रिट्विट केली गेली आणि त्याला 413.3k लाईक्स मिळाल्या आहेत.

या ट्विटबद्दल ट्विटर इंडियाच्या(Twitter India) ब्लॉगमध्ये लिहिण्यात आले आहे की ‘क्रीडा प्रकारात विराट कोहलीने धोनीला वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छांच्या ट्विटला सर्वाधिक रिट्विट आले आहेत. या ट्विटमध्ये विराट आणि धोनी यांचा एक फोटो आहे. ज्याने अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांचे मन जिंकले आहे.’

धोनी मागील अनेक महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने त्याचा शेवटचा सामना 2019 विश्वचषकात न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे.

त्यामुळे त्याच्या भविष्याबाबत सातत्याने भारतीय क्रिकेट वर्तुळात चर्चा होत आहे. पण काही दिवसांपूर्वीच धोनीने जानेवारीपर्यंत त्याला याबबात काहीही विचारू नका असे म्हटले होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---