वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ गुरुवारी (19 ऑक्टोबर) पुण्यात बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे स्टेडियम मोठ्या काळानंतर एखाद्या आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी तयार आहे. त्यातही हा विश्वचषकाचा सामना असल्यामुळे त्याला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. गुरुवारी बांगलादेशविरुद्ध एमसीए स्टेडियमवर भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यातील गोलंदाज पुन्हा एकदा जागा झाला.
विराट कोहली (Virat Kohli), मागच्या मोठ्या काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला नव्हता. वनडे क्रिकेटमध्ये विराट जवळपास सहा वर्षांनंतर गोलंदाजी करताना दिसला. त्याने ऑगस्ट 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे सामन्यात दोन षटके गोलंदाजी केली होती. या दोन षटकात 17 धावा खर्च केल्यानंतर विराटला एकही विकेट मिळाली नव्हती. दरम्यानच्या काळात विराटने फेब्रुवारी 2020 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात, तर ऑगस्ट 2022 मध्ये हाँगकाँगविरुद्धच्या टी-20 सामन्यात गोलंदाजी केली होती. पण वनडे क्रिकेटमध्ये मागचा मोठा काळ विराटने एकही चेंडू टाकला नव्हता. गुरुवारी हार्दिक पंड्याला दुखापत झाल्यामुळे चाहत्यांना विराट वनडे सामन्यात पुन्हा गोलंदाजी करताना दिसला.
Last time #ViratKohli bowled in an ODI was against Sri Lanka on 31 Aug 2017. #INDvsBAN #CWC23 pic.twitter.com/0tJcyrqoQ3
— Shahzad Tirmizi Syed (@shahzadtirmizi) October 19, 2023
बांगलादेशच्या डावातील नवव्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला होता. हार्दिकने पहिले तीन चेंडू टाकल्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. षटकातील तिसऱ्या चेंडूवर गोलंदाजी करणाऱ्या हार्दिकने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचा पाय मुरगळल्याचे पाहायला मिळाले. हार्दिकच्या दुखापतीनंतर बांगलादेशसाठी नवव्या षटकातील राहिलेले तीन चेंडू विराटने टाकले. विराट गोलंदाजीला आल्याचे पाहाताच मैदानातील चाहत्यांचा आवाच सर्वत्र घुमला.
https://www.instagram.com/reel/Cyk2FkDPydN/?utm_source=ig_web_copy_link
(Virat Kohli bowled after almost six years in ODI cricket)
विश्वचषकातील 17व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
बांगलादेश- लिटन दास, तनजीद हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहदी हसन मिराज, तौहिद ह्रदोय, मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), महमुदुल्लाह, नसूम अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शोरीफुल इस्लाम
महत्वाच्या बातम्या –
‘आमच्यावेळचा पाकिस्तान संघ वेगळा होता, आताचा…’, बाबरसेनेविषयी ‘दादा’चं रोखठोक वक्तव्य
ऑलिम्पिक 2028 मध्ये ‘या’ खेळाडूंचा राहणार दबदबा, दिग्गजाने घेतली आश्चर्यचकित करणारी नावे