---Advertisement---

Video: विराट करतोय गोलंदाजीचा सराव, चाहत्यांनी दिला खास सल्ला

On: शुक्रवार, मे 31, 2019 5:18 PM
---Advertisement---

साउथँम्पटन। गुरुवारपासून(30 मे) 12 व्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकाला सुरुवात झाली आहे. या विश्वचषकातील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. हा सामना साउथँम्पटनला होणार आहे.

या सामन्याआधी भारताचा कर्णधार विराट कोहलीने फलंदाजीबरोबरच गोलंदाजीचाही सराव केला आहे. विराटच्या गोलंदाजीच्या सरावाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये मध्यम गतीने गोलंदाजी करणारा विराट नेटमध्ये ऑफ कटर टाकण्याचा सराव करताना दिसला आहे. बीसीसीआयने या व्हिडिओला ‘नेटमध्ये फलंदाजी करण्याआधी कर्णधाराचे थोडा गोलंदाजीचा सराव’ या अर्थाचे कॅप्शन दिले आहे.’

बीसीसीआयने टाकलेल्या या व्हिडिओवर अनेक चाहत्यांच्या कमेंट्स आल्या आहेत. यामध्ये चाहत्यांनी विराटला भारताचा गोलंदाजीसाठीचा सहावा पर्याय म्हटले आहे.

विराटने याआधी 227 वनडे सामन्यांपैकी 48 सामन्यात गोलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने 4 विकेट्स घेतल्या आहेत.

भारताकडे सध्या हार्दिक पंड्या, विजय शंकर हे अष्टपैलू खेळाडू संघात आहेत. त्याचबरोबर केदार जाधव देखील ज्यादाचा गोलंदाजी पर्याय भारताकडे आहे. असे असले तरी आता फलंदाजीमध्ये शानदार कामगिरी करणारा भारताचा अव्वल क्रमांकाचा फलंदाज विराट या विश्वचषकात गोलंदाजी करणार का हे पहावे लागेल.

https://twitter.com/ar_saikumar1/status/1134036255853797377

https://twitter.com/starrlord2011/status/1134037140910686209

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषक २०१९: आज होणाऱ्या विंडीज विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा असा आहे इतिहास

बेन स्टोक्सने केली विश्वचषकातील तब्बल २३ वर्षांपूर्वीच्या मोठ्या पराक्रमाची बरोबरी

…आणि क्विंटन डीकॉक आऊट होता होता वाचला, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment