भारतीय क्रिकेटपटू सूर्यकुमार यादव याला त्याच्या 360 डिग्री फलंदाजीसाठी ओळखले जाते. आशिया चषक 2022 मधील हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातही त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. चौकार-षटकारांची आतिषबाजी करत त्याने झंझावाती अर्धशतक केले आणि संघाला 192 धावांपर्यंत मजल मारून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याच्या या वादळी खेळीचा अगदी रनमशीन विराट कोहली हादेखील चाहता बनला. त्याने डाव संपल्यानंतर सूर्यकुमारला बघून दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे झालेल्या भारत विरुद्ध हाँगकाँग (India vs Hongkong) संघात झालेल्या सामन्यात भारताने 40 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकात 2 बाद 192 धावा केल्या. प्रत्युत्तरात हाँगकाँगला निर्धारित 20 षटकात 5 विकेट्सच्या नुकसानावर 152 धावाच करू शकला आणि भारताने 40 धावा राखून हा सामना जिंकला.
भारतीय संघाकडून सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) चमकदार प्रदर्शन केले. विराट कोहलीला (Virat Kohli) साथ देत त्याने 26 चेंडूत नाबाद 68 धावा फटकावल्या. 6 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने त्याने ही वादळी खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 261.54 इतका होता. त्यातही विसाव्या षटकात त्याची फलंदाजी पाहण्यासारखी होती. हाँगकाँगचा गोलंदाज हरून अर्शदच्या या षटकात सूर्यकुमारने 4 षटकारांच्या मदतीने 26 धावा जमवल्या. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवर त्याने षटकार ठोकले. शेवटच्या चेंडूवर 2 धावा काढत 26 धावा जमवल्या.
https://twitter.com/Brahman_Kuldip/status/1565016152237289472?s=20&t=bci8nzjJ8C9cPD9o8TSy_A
नॉन स्ट्राईकरवरून विराट सूर्यकुमारची फलंदाजी लाईव्ह पाहात होता. त्याच्या बॅटमधून एकमागोमाग एक निघत असलेल्या शॉटला पाहून विराट मंत्रमुग्ध झाला. त्याने भारतीय संघाचा डाव संपल्यानंतर सूर्यकुमारला खाली वाकून नमस्कार (Virat Kohli Bows To Suryakumar Yadav) केला. स्वत: किंग कोहली आपल्यापुढे नतमस्तक झाल्याचे पाहून सूर्यकुमारलाही कौतुक वाटले. त्याने हसत विराटला धन्यवाद म्हणत त्याची गळाभेट घेतली. हा प्रसंग कॅमेरात कैद झाला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat Kohli's reaction for SuryaKumar Yadav and his innings. pic.twitter.com/zCV3YmNPOE
— Tanuj Singh (@ImTanujSingh) August 31, 2022
दरम्यान हाँगकाँगला 40 धावांनी पराभूत करत भारतीय संघाने आशिया चषक 2022 मधील दुसरा विजय नोंदवला आहे. यापूर्वी भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानला 5 विकेट्सने पराभूत केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या पिटाऱ्यात आऊट ऑफ सिलॅबस शॉट, खुद्द हिटमॅन रोहितकडून कौतुकाचा वर्षाव
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाचं फळफळलं नशीब, टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात निवड
भारताच्या विजयानंतर आमिरवर भडकले पाकिस्तानी फॅन्स; म्हणाले, “तू फिक्सर होतास आणि राहशील”