सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे. परंतु, ऑमीक्रॉनची भीती पाहता, या मालिके बाबत महत्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात.अशातच विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
गेल्या २ वर्षांपासून जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यावर तोडगा निघत असताना आता दक्षिण आफ्रिकेतून ऑमीक्रॉन हा कोरोनाचा नवीन प्रकार समोर आला आहे. अशातच बीसीसीआयच्या (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा एक आठवड्यासाठी पुढे ढकलला जाऊ शकतो.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेला १८ डिसेंबर पासून प्रारंभ होणार आहे. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र विराट कोहलीने आता बीसीसीआयकडे सर्व गोष्टी स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
याबाबत बोलताना विराट कोहली म्हणाला की, “जितकं लवकर होईल तितक्या लवकर याबाबत निर्णय घेतला गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत चर्चा देखील केली आहे. राहुल भाईने (राहुल द्रविड) देखील चर्चा करायला सुरुवात केली आहे. जे खूप महत्वाचे आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “ही एका स्वाभाविक गोष्ट आहे,आम्ही सामान्य परिस्थितीत खेळत नाहीये. त्यामुळे अनेक योजना आखल्या जातात. पूर्वतयारी करावी लागते. आपण प्रत्येक गोष्टीचा वास्तविकरित्या विचार केला पाहिजे. आपण काही गोष्टींवर दुर्लक्ष करू शकत नाही, जे आम्हाला गोंधळून टाकणाऱ्या ठिकाणी घेऊन जातील आणि ज्या ठिकाणी कोणालाही जायचे नसेल.”
असे आहे भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचे वेळापत्रक
कसोटी मालिका
१)पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२१, जोहान्सबर्ग
२)दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२१, सेंच्युरियन
३)तिसरा कसोटी सामना – ३ जानेवारी ते ७ जानेवारी २०२२,जोहान्सबर्ग
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – ११ जानेवारी २०२२, पार्ल
२)दुसरा वनडे सामना -१४ जानेवारी २०२२,केपटाऊन
३)तिसरा वनडे सामना -१६ जानेवारी २०२२,केपटाऊन
टी-२० मालिका
१)पहिला टी -२० सामना – १९ जानेवारी २०२२,केपटाऊन
२) दुसरा टी-२० सामना – २१ जानेवारी,२०२२,केपटाऊन
३)तिसरा टी -२० सामना – २३ जानेवारी,२०२२, पार्ल
४)चौथा टी -२० सामना -२६ जानेवारी,२०२२, पार्ल
महत्त्वाच्या बातम्या –
सुवर्णसंधी! आर अश्विनला ३ मोठी विक्रम मोडण्याची, तर कोहलीकडे पाँटिंगशी बरोबरी करण्याची संधी
“केकेआर माझं दुसरं घर”, रिटेन केल्यानंतर सुनील नरेन झाला इमोशनल