इंदोर । कर्णधार विराट कोहली सध्या फलंदाज आणि कर्णधार म्हणून ना भूतो ना भविष्यती अशी कामगीरी करत आहे. हा खेळाडू प्रत्येक सामन्यागणिक काही ना काही खास विक्रम करत आहे.
आजही विराटने जेव्हा ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या वनडेत २३ वी धाव घेतली तेव्हा त्याने वनडेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताच्याच युवराज सिंगला मागे टाकले.
युवराजने २००० ते २०१७ या काळात ३०४ सामन्यात ८७०१ धावा केल्या आहेत तर विराटने एवढ्याच धावा करण्यासाठी केवळ १९७ सामने घेतले आहे. विराटच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात होऊन आता जेमतेम ९वर्ष झाली आहेत. युवराज सिंग आणि विराट यांच्या फलंदाजी क्रमांकात जरी फरक असला तरी विराटने यासाठी घेतलेले सामने पाहता हा मोठा विक्रम आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वनडेत सार्वधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आता २१व्या स्थानावर पोहचला आहे. विराटला वनडेत ९००० धावा करण्यासाठी आता केवळ ३०० धावांची गरज आहे.
भारताकडून वनडेत सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
१८४२६ सचिन तेंडुलकर (सामने- ४६३)
११३६३ सौरव गांगुली (सामने-३११ )
१०८८९ राहुल द्रविड (सामने- ३४४)
९७४२ एमएस धोनी (सामने-३०४ )
९३७८ मोहम्मद अझरुद्दीन (सामने- ३३४)
८७०५ विराट कोहली (सामने- १९७)
८७०१ युवराज सिंग (सामने- ३०४)