भारत विरुद्ध न्यूझीलंडमधील कानपूर कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर आता ३ डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर दुसरी कसोटी सुरु होईल. भारताचा कर्णधार विराट कोहली या कसोटीमधून संघात पुनरागमन करेल. टी-२० विश्वचषकामधील खराब प्रदर्शनानंतर कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. कोहलीने २ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकही शतक नाही मारले आणि त्यामुळेच चाहत्यांची त्याने शतक मारण्याची उत्सुकता कायम आहे.
मुंबईत होऊ शकतो उत्सुकतेचा शेवट
कर्णधार कोहलीला शेवटचे शतक मारून आज ७४० दिवस पूर्ण झाले. वानखेडे कसोटी सुरु होईपर्यंत २ दिवस अजून म्हणजे ७४२ दिवस. परंतु त्याची ही प्रतीक्षा मुंबईमध्ये संपू शकते. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोहलीचे प्रदर्शन खूप चांगले राहिले आहे. भारतातला पहिला कसोटी सामना कोहलीने वानखेडे स्टेडियमवरच खेळला होता आणि दोन्ही डावांत ५०+ धावा देखील केल्या होत्या.
वानखेडे स्टेडियमवर विराटने एकूण ४ सामने खेळले आहेत. त्या सामन्यांत त्याने ७२ च्या सरासरीने ४३३ केल्या आहेत. ६ डावांत त्याने १ शतक आणि ४ अर्धशतक केले आहेत. विराटने वानखेडेवरच्या शेवटच्या सामन्यात द्विशतक साजरे केले होते. त्याने इंग्लंडविरुद्ध २०१६ मध्ये ३४० चेंडूत २३५ धावा केल्या होत्या.
हे आकडे बघून आपण असं म्हणूच शकतो की विराट खराब फॉर्ममध्ये असून देखील त्याची ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा मुंबईच्या कसोटीत संपू शकते.
५६ डावांपासून शतकांची प्रतीक्षा
विराट कोहलीचं शेवटचं आंतरराष्ट्रीय शतक बांगलादेशविरुद्ध गुलाबी चेंडूच्या कसोटीत आलं होतं. त्याने बांगलादेश विरुद्ध १३६ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना एक डाव आणि ४६ धावांनी जिंकला होता. यानंतर विराटने ५० सामने खेळले त्या ५६ डावांत तो शतक नाही मारू शकला.
विराटने शेवटच्या आंतरराष्ट्रीय शतकानंतर आतापर्यंत १२ कसोटी सामने, १५ वनडे आणि २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळला. त्या १२कसोटी सामन्यात त्याने २६.८० च्या सरासरीने ५६३ धावा केल्या ज्यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे. १५ वनडे सामन्यात ८ अर्धशतकांसह ८४९ धावा केल्या. त्याने २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ७ अर्धशतकांसह ७७७ धावा केल्या. यादरम्यान त्याने २० वेळा अर्धशतक करण्याचा विक्रम देखील केला पण तो ते शतकात रूपांतर नाही करू शकला.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबईचा अभिमान पोलार्ड तात्या! अवघ्या ६ कोटीत मान्य केले रिटेंशन
अल्टिमेट कराटे लीगमध्ये पुणे डिव्हाईनचा संघ ‘विनिंग किक’ मारून विजेतेपद पटवण्यासाठी सज्ज