---Advertisement---

…म्हणून धोनीबरोबरील तो फोटो शेअर केला होता, विराट कोहलीने केला खूलासा, पहा व्हिडिओ

---Advertisement---

उद्यापासून (15 सप्टेंबर)भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात टी20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेआधी आज(14 सप्टेंबर) भारताचा कर्णधार विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला.

या दरम्यान विराटला त्याने गुरुवारी(12 सप्टेंबर) भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीबरोबरील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, त्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

या फोटोमुळे धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. पण हा फोटो शेअर करताना असा कोणताही विचार मनात आला नसल्याचे विराटने स्पष्ट केले आहे.

विराटने गुरुवारी धोनीबरोबरचा 2016 टी20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या उपांत्यपूर्व सामन्यातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला त्याने कॅप्शन दिले होते की ‘हा सामना मी कधीही विसरु शकत नाही. खास रात्र होती. या व्यक्तीने(धोनीने) मला फिटनेस टेस्ट प्रमाणे धावायला लावले होते.’

विराटच्या या पोस्ट नंतर अचानक धोनी निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात झाल्या. तसेच याबद्दलच्या पोस्टही व्हायरल झाल्या होत्या. पण नंतर निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी ‘धोनीच्या निवृत्तीबद्दल कोणतेही अपडेट्स आलेले नाही. निवृत्तीचे वृत्त खोटे आहे’, असे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला होता.

तसेच धोनीची पत्नी साक्षीनेही ‘याला अफवा म्हणतात’ असे ट्विट करत धोनी निवृत्त होणार नसल्याचे सुचवले होते.

या सर्व घटना घडल्यानंतर आज विराट त्याने धोनीबरोबरील शेअर केलेल्या फोटोबद्दल खूलासा करताना म्हणाला, ‘माझ्या मनात दूर दूर पर्यंत असे काहीही नव्हते. मी फक्त घरी बसलो असताना तो फोटो पोस्ट केला आणि त्याची बातमी झाली. हा माझ्यासाठी एक धडा आहे की मी जो विचार करतो तोच विचार सर्वजण करत असतील असे नाही.’

‘मी त्या पोस्टमध्ये लिहीले होते की ती रात्र खास होती. मला आजही तो सामना आठवतो. मी त्याबद्दल कधी उघडपणे बोललो नव्हतो. त्यामुळे मी विचार केला की त्यावर एक पोस्ट टाकू. पण लोकांनी त्या पोस्टला वेगळे वळण दिले.’

विराटचा धोनीबरोबरील या फोटोबद्दल बोलतानाचा व्हि़डिओ बीसीसीआयने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

याबरोबरच विराट धोनीच्या निवृत्तीबद्दल म्हणाला, ‘तूम्हाला पटेल किंवा नाही, पण अनुभव हा नेहमीच महत्त्वाचा असतो. अनेक खेळाडूंनी वय हा फक्त आकडा असल्याचे सिद्ध केले आहे आणि धोनीनेही असे अनेकदा त्याच्या कारकिर्दीत केले आहे.’

‘त्याच्याबाबतीत एक गोष्ट खास आहे की तो भारतीय क्रिकेटचा विचार करतो. क्रिकेटमधून कधी निवृत्ती घ्यायची हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे. यामध्ये कोणीही कोणतीही मते मांडू नयेत.’

https://www.instagram.com/p/B2YwZwSgsrD/

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

टीम इंडियाने सातव्यांदा जिंकला १९ वर्षांखालील आशिया चषक; फायनलमध्ये बांगलादेशला केले पराभूत

संपूर्ण वेळापत्रक: असे होणार आहेत टीम इंडियाचे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२०, कसोटी सामने

टॉप ५ : स्टिव्ह स्मिथच्या या ५ विक्रमांकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही…

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment