---Advertisement---

दुसऱ्या कसोटीत विराटने विश्रांती घ्यावी आणि मयंक अगरवालला खेळवावे

On: रविवार, ऑक्टोबर 7, 2018 4:34 PM
---Advertisement---

भारतीय संघाने शनिवारी विंडिज विरुद्ध पहिला कसोटी सामना तिसऱ्याच दिवशी एक डाव आणि 272 धावांनी जिंकला. यामुळे आता भारताने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताचा विंडिज विरुद्धचा दुसरा सामना 12 आॅक्टोबरला हैद्राबादमध्ये होणार आहे. या समान्यासाठी भारतीय संघाने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देऊन मयंक अगरवालला त्याच्याऐवजी खेळवावे, असे मत भारताचा माजी फिरकीपटू आणि सध्याचा समालोचक मुरली कार्तिकने मांडले आहे.

पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ विराटला विश्रांती देऊ शकतो. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याआधी मयंकला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी देऊ शकतात, असे कार्तिकने म्हटले आहे.

कार्तिक स्टार स्पोर्ट्स इंडियाशी बोलताना म्हणाला, “मी मयंक अगरवालबद्दल विचार करत आहे. या मालिकेतून काय घेण्याचा प्रयत्न करत आहात याकडे लक्ष द्यायला हवे. आस्ट्रेलिया दौऱ्यासाठी खेळांडूंची कामगिरीकडे लक्ष आहे.”

“भारत दुसरा कसोटी सामना विराट शिवायही जिंकू शकतात, ज्याप्रमाणे एशिया कप जिंकला.”

“विराट हा चॅम्पियन खेळाडू आहे. तो विंडिज विरुद्ध विश्रांती घेऊ शकतो. नक्कीच विंडिजचा मान राखून मी बोलत आहे. जेव्हा तूम्ही पाहता की या स्तरावर संघ अशी कामगिरी करत आहे तर मयंक हा विराट किंवा केएल राहुलच्या ऐवजी एक चांगला पर्याय आहे.”

पुढे कार्तिक म्हणाला, “काही असे खेळाडू आहेत जे फक्त कसोटी खेळतात. त्यामुळे इशांत शर्मा आणि चेतेश्वर पुजारा सारख्या खेळाडूला वगळण्याची तूमची इच्छा नसते.”

याबरोबरच कार्तिक म्हणाला की जर मयंक अगरवालचा आॅस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी विचार करत असाल तर त्याला इथे कसोटीमध्ये संधी द्यायला हवी.

महत्वाच्या बातम्या-

परदेश दौऱ्यात पत्नीला सोबत घेऊन जाण्यासाठी खेळाडूंना परवानगी द्यावी, विराट कोहलीची बीसीसीआयला विनंती

विराट कोहली आणि टीम इंडियाकडून शिकण्याचा विंडिजला फायदा होईल

…आणि कुलदीप यादव बनला समालोचक; केले स्वत:च्या गोलंदाजीचे समालोचन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment