भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया संघात आगामी 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही स्पर्धा खेळली जाणार आहे. ज्याची सुरूवात (22 नोव्हेंबर) पासून होणाार आहे. दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी पर्थच्या मैदानावर भिडणार आहेत. या स्पर्धेत सर्व भारतीय चाहत्यांना ‘विराट कोहली’कडून (Virat Kohli) मोठ्या अपेक्षा असतील. सध्या तो खराब फॉर्मशी झुंजत आहे. पण पहिल्याच सामन्यात तो स्टार भारतीय खेळाडूचा रेकाॅर्ड मोडीत काढेल.
खरेतर, विराट कोहलीने (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरूद्ध आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 25 कसोटी सामन्यांमध्ये 47.48च्या सरासरीने 2,042 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याने 5 अर्धशतकांसह 8 शतके झळकावली आहेत. तर चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) ऑस्ट्रेलियाविरूद्ध 25 कसोटी सामने खेळताना 49.38च्या सरासरीने 2,074 धावा केल्या आहेत. त्याला मागे टाकण्यासाठी कोहलीला आणखी 33 धावांची गरज आहे. यासह कोहली ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरणार आहे.
सध्या या यादीत विराट कोहली (Virat Kohli) पाचव्या स्थानी आहे. पुजारा बराच काळ कसोटी संघाबाहेर आहे. त्याची शेवटची कसोटी 2023 मध्ये इंग्लंडविरूद्ध होती, जी आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची अंतिम होती.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या 3 फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) आणि राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचा समावेश आहे. सचिनने 39 कसोटी सामन्यात 55च्या सरासरीने 3,630 धावा केल्या, ज्यात 11 शतकांचाही समावेश आहे. लक्ष्मणने 29 सामन्यात 2,434 धावा केल्या, तर द्रविडने 32 सामन्यात 2166 धावा केल्या.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर
बॉर्डर गावसकर मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
पहिली कसोटी: 22-26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरी कसोटी: 6-10 डिसेंबर, ॲडलेड (दिवस-रात्र कसोटी)
तिसरी कसोटी: 14-18 डिसेंबर, ब्रिस्बेन
चौथी कसोटी: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवी कसोटी: 3-7 जानेवारी, सिडनी
महत्त्वाच्या बातम्या-
IPL Auction; किती खेळाडूंवर लागणार बोली? सर्व खेळाडू विकले जाणार? जाणून घ्या एक क्लिकवर
‘या’ दिवशी होणार चॅम्पियन्स ट्राॅफीचे वेळापत्रक जाहीर! भारत की पाकिस्तान कोणाचा पत्ता कटणार?
IND vs AUS; विराट कोहली धावांचा भुकेला आहे, माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य!