इंदोर। आज भारत विरुद्ध श्रीलंका संघात दुसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना इंदोरमधील होळकर क्रिकेट स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला तीन खास विक्रम करण्याची संधी आहे.
या सामन्यात विराट करु शकतो हे विक्रम –
आज विराट कोहलीने 1 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो रोहित शर्माला मागे टाकून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित आणि विराटच्या नावावर संयुक्तरित्या आहे. या दोघांनीही प्रत्येकी 2633 धावा केल्या आहेत.
तसेच आज जर विराटने 24 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 1000 धावा पूर्ण करेल. तसेच हा पराक्रम करणारा तो एकूण 6 वा तर दुसरा भारतीय कर्णधार ठरेल.
विराटला आणखी एक खास विक्रम करण्याची संधी आहे. जर विराटने 31 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा पूर्ण करेल असा पराक्रम करणारा तो एकूण 6 वा तर दुसरा भारतीय कर्णधार ठरेल.
वारे पठ्ठ्या! हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी २०२०चा विजेता https://t.co/3cGR8qaNuo#Kusti #maharashtrakesari #म #मराठी
— Maha Sports (@Maha_Sports) January 7, 2020
विराट, गंभीर पाठोपाठ रिकी पाँटिंगनेही केला या गोष्टीला विरोध
वाचा👉https://t.co/5aVDftUIgV👈#म #मराठी #Cricket @RickyPonting— Maha Sports (@Maha_Sports) January 7, 2020