---Advertisement---

दुसऱ्या वनडेत ‘या’ गोष्टीवर असेल सर्वांचेच लक्ष

---Advertisement---

ऑकलंड। उद्या(8 फेब्रुवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात इडन पार्क येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास विक्रम करण्याची संधी आहे.

या सामन्यात जर विराट कोहलीने 22 किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो वनडेमध्ये परदेशात 7000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा गाठेल. तसेच परदेशात 7000 वनडे धावा पूर्ण करणारा एकूण 11 वा तर भारताचा 4था क्रिकेटपटू ठरेल. याआधी सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या भारतीयांनी परदेशात 7000 पेक्षा अधिक वनडे धावा केल्या आहेत.

विराटने सध्या परदेशात खेळताना 151 वनडे सामन्यात 59.13 च्या सरासरीने 6978 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 24 शतकांचा आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे.

तसेच वनडेमध्ये परदेशात सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने परदेशात 299 वनडे सामने खेळताना 43.04 च्या सरासरीने 11450 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 29 शतकांचा आणि 58 अर्धशतकांचा समावेश आहे.

परदेशात सर्वाधिक वनडे धावा करणारे फलंदाज – 

11450 धावा – सचिन तेंडूलकर (भारत)

9550 धावा – सनथ जयसुर्या (श्रीलंका)

9510 धावा – कुमार संगकारा (श्रीलंका)

9065 धावा – इंजमाम उल हक (पाकिस्तान)

8604 धावा – माहेला जयवर्धने (श्रीलंका)

8298 धावा – रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया)

8253 धावा – सौरव गांगुली (भारत)

7483 धावा – राहुल द्रविड (भारत)

7227 धावा – सईद अन्वर (पाकिस्तान)

7181 धावा – ब्रायन लारा (वेस्ट इंडिज)

6978 धावा – विराट कोहली (भारत)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---