भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिका गुरुवारी (11 जानेवारी) सुरू होणार आहे. या मालिकेसाठीचा 16 सदस्यीय संघ बीसीसीआयने रविवारी (7 जानेवारी) घोषित केला. रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज फलंदाजांना मोठ्या काळानंतर टी-20 संघात सामील केले गेले. आगामी टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी विराटचे संघातील पुनरागमन महत्वाचे ठरेल. विराट यावर्षीच्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील ही टी-20 मालिका तीन सामन्यांची आहे. मालिकेतील पहिला सामना 11, दुसरा सामना 14, तिसरा सामना 17 जानेवारी रोजी खेळला जाणार आहे. रोहित शर्मा पुन्हा एकदा कर्णधार म्हणून भारताच्या टी-20 संघाची सूत्रे हातात घेत आहे. तसेच त्याच्या साधीने मागच्या 14 महिन्यांमध्ये टी-20 क्रिकेट न खेळणारा विराट कोहली (Virat Kohli) देखील अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना दिसले.
जून महिन्यात टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित होणार, त्याला अजून बराच काळ आहे. पण अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ, टी-20 विश्वचषकात खेळताना दिसू शकतो. काही प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार नाहीत. त्यांचे मात्र विश्वचषक संघात पुनरागमन होऊ शकते. विराट कोहली विश्वचषकात खेळला, तर कारकिर्दीत चौथ्यांदा टी-20 विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो.
विराटने याआधी आयसीसी टी-20 विश्वचषक 2014, 2016 आणि 2022 मध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या. टी-20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज समजला जाणारा विराट आघामी हंगामात देखील धावांचा पाऊस पाडू शकतो, यात कुठलीच शंका नाही. विराटने 2014 विश्वचषकाच्या हंगामात 6 सामन्यांमध्ये 319 धावा केल्या होत्या. ही विश्वचषकाच्या एका हंगामात एखाद्या फलंदाजाचे सर्वात्तम प्रदर्शन आहे. टी-20 विश्वचषक 2016 मध्ये विराटने 5 सामन्यांमध्ये 281 धावा केल्या, जे हंगामातील सर्वोत्तम प्रदर्शन ठरले. मागचा टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पार पडला. याही हंगामात विराटनेच सर्वाधिक 296 धावा केल्या होत्या.
2014, 2016 आणि 2022 टी-20 विश्वचषकांमध्ये सर्वाधिक धावा करणारा विराट आगामी टी-20 विश्वचषकात काय प्रदर्शन करतो? याकडे सर्वांचेच लक्ष असेल. (Virat Kohli can score Most runs in T20 World Cup 2024)
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयसवाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या –
‘यासाठी टी20 क्रिकेट जबाबदार’, केपटाऊन कसोटी दीड दिवसात संपल्यानंतर डिविलियर्सचे मोठे विधान
Sydney Test । मॅकग्रा कुटुंबीय हात मिळवण्यासाठी उत्सुक, पण रिझवानचा थेट नकार, व्हिडिओची तुफान चर्चा