ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाने तीन वन-डे सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकत इतिहास रचला होता. यामध्ये भारतीय यष्टीरक्षक एमएस धोनीने सलग तीन अर्धशतके केली होती.
ही मालिका जिंकूनही भारताला अजुनही एका समस्येवर तोडगा मिळालेला नाही. ते म्हणजे चौथ्या क्रमांकावर कोणाला फलंदाजीला पाठवायचे याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अंबाती रायडूने पहिल्या दोन सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. मात्र तो यामध्ये अपयशी ठरला होता.
तिसऱ्या सामन्यात तर धोनीनेच चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद 87 धावा करत संघाला सामन्याबरोबर मालिकाही जिंकून दिली होती.
यामुळे धोनी चौथ्या क्रमांकावरच फलंदाजीला येणार का असे विचारले असता कर्णधार विराट कोहलीने त्याच्यासाठी 5 वा क्रमांक हा योग्य असल्याचे म्हटले होते.
“5व्या क्रमांकावर धोनी खेळायला आला तर त्याला काही वेळही मिळेल आणि तो सामन्याच्या शेवटपर्यंत खेळूही शकतो”, असे विराट म्हणाला होता. तसेच विराट म्हणाला होता की फलंदाजीचा क्रमांक हा संघाच्या समतोलवर अवलंबून असतो. त्यामुळे अनेक गोष्टी महत्त्वाच्या असतात.
याचमुळे धोनी संघाच्या गरजेनुसार चौथ्या, पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.
2008-09च्या न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली पाच सामन्यांच्या वन-डे मालिका 3-1 अशी जिंकली होती. तर एका सामन्याचा निकाल लागला नव्हता.
2014मध्ये भारतीय संघ धोनीच्याच नेतृत्वाखाली न्यूझीलंड दौऱ्यावर गेला होता. यामध्ये मात्र भारताला पाच सामन्यांच्या वन-डे मालिकेत 4-0 असा मोठा पराभव स्विकारावा लागला होता. यामध्ये केन विलियमसनने सलग पाच अर्धशतके केली होती.
भारत न्यूझीलंड विरुद्ध पहिला वन-डे सामना उद्या (23 जानेवारी) खेळणार आहे. हा सामना नेपियरला होणार असून त्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 7.30 वाजता सुरूवात होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–खेळाडूंपाठोपाठ भारताचे निवड समिती सदस्यही होणार मालामाल
–आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार पटकावल्यानंतर कर्णधार कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया
–न्यूझीलंड-भारत वनडे मालिकेत विराट कोहलीला हा खेळाडू ठरू शकतो वरचढ





