---Advertisement---

व्हिडिओ : मॅक्सवेलचे अर्धशतक होताच कोहली झाला भलताच खुश, उत्साहात केले अभिनंदन

On: रविवार, एप्रिल 18, 2021 6:42 PM
---Advertisement---

आयपीएलचा दहावा सामना आज चेन्नईच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाईट राइडर्स संघात खेळवला गेला. या सामन्यात बंगलोरच्या संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाताने मागील सामन्यातील अंतिम अकराचा संघ या सामन्यासाठी कायम ठेवला. तर बंगलोरच्या संघाने अष्टपैलू डॅनियल ख्रिस्टियनला वगळून रजत पट्टीदारला संधी दिली.

मात्र प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगलोरची एकवेळ २ बाद ९ अशी अवस्था झाली होती. त्यावेळी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल त्यांच्या मदतीला आला. मॅक्सवेलने ७८ धावांची खेळी साकारत बंगलोरला सुस्थितीत नेले. त्याच्या या खेळीवर कर्णधार कोहली भलताच खुश झाल्याचे दिसून आले. मॅक्सवेलचे अर्धशतक पूर्ण झाल्यावर कोहलीने दिलेली दाद चाहत्यांचे लक्ष वेधून घेते आहे.

मॅक्सवेलचे तुफानी अर्धशतक
यंदाच्या आयपीएल हंगामात पहिले दोन्हीही सामने जिंकून बंगलोरने हंगामाची झोकात सुरुवात केली होती. हाच फॉर्म कोलकाता विरुद्धच्या सामन्यात कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र कोलकात्याचा ऑफस्पिनर वरुण चक्रवर्तीने डावाच्या सुरुवातीलाच बंगलोरच्या विराट कोहली आणि रजत पट्टीदारला बाद करत बंगलोरला धक्का दिला होता. मात्र त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने सलामीवीर देवदत्त पड्डीकलच्या साथीने डाव सावरला. सुरुवातीला सावध पवित्रा घेणार्‍या मॅक्सवेलने नंतर चौफेर फटकेबाजी केली.

नवव्या षटकात शेवटच्या चेंडूवर मॅक्सवेलने पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर एक धाव घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. अवघ्या २८ चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. बंगलोर साठी त्याचे अर्धशतक अतिशय महत्त्वाचे ठरले. त्यामुळे त्याचे हे अर्धशतक पूर्ण होताच डग आऊट मध्ये असलेला विराट कोहली उठून उत्साहाने त्याचे अभिनंदन करतांना दिसला. मॅक्सवेलची खेळी बंगलोरसाठी किती महत्वाची होती, हे विराटच्या देहबोलीतून यावेळी स्पष्ट दिसून आले.

https://twitter.com/Constantine_YT/status/1383735933640478723

https://twitter.com/vivekdwivedi287/status/1383735182193160197

https://twitter.com/ArbazHus77/status/1383738732667232257

बंगलोरने उभारली विशाल धावसंख्या
दरम्यान, मॅक्सवेलसह एबी डिव्हिलियर्सने झळकवलेल्या वादळी अर्धशतकाने बंगलोरने पहिल्या डावात विशाल धावसंख्या उभारली. मॅक्सवेलने ७८ तर डिव्हिलियर्सने ७६ धावांची खेळी केली. त्यामुळे निर्धारित २० षटकांत बंगलोरने ४ बाद २०४ धावा करत कोलकाताला विजयासाठी २०५ धावांचे लक्ष्य दिले.

महत्वाच्या बातम्या:

RCBvKKR: कोटीत पैसा मोजलेल्या दिग्गजाला बाहेर करत २० लाखाच्या खेळाडूला विराटने दिली संधी अन् पडला तोंडघशी

राहुल त्रिपाठीने पकडला विराटचा हंगामातील सर्वोत्कृष्ट झेल? व्हिडिओ होतोय व्हायरल

काय सांगता! तब्बल १९५ आयपीएल सामन्यानंतर विराट अशाप्रकारे झाला बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---