भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडचे फलंदाज झटपट बाद करून भारतीय गोलंदाजांनी जो रुटचा निर्णय चुकीचा सिद्ध केला. इंग्लंडचा कर्णधार जो रुटला बाद केल्यानंतर विराट कोहलीने एका दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडू समान आनंद साजरा केला.
ऑस्ट्रेलियन दिग्गजाप्रमाणे साजरा केला आनंद
गुलाबी चेंडूने खेळल्या जात असलेल्या या कसोटी सामन्यात इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नव्हती. ज्यामुळे, कर्णधार जो रूटला लवकर खेळपट्टीवर यावे लागले. जो रूट आणि जॅक क्राऊलीने भागीदारी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, अश्विनने क्राऊली आणि जो रूटची ही भागीदारी जास्त काळ टिकू दिली नाही आणि रूट बाद झाला. अश्विनने रूटला १७ धावांवर बाद केले. या महत्वपूर्ण बळीमुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली खूप खूष झाला आणि त्याने तो आनंद वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
जो रुटला बाद केल्याने विराट कोहलीने ब्रेट लीसारखा जल्लोष केला. अश्विनने रुटला बाद करतात विराटने तीन वेळा मैदानाकडे पंच केले. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा बळी मिळविल्यानंतर अशाप्रकारे जल्लोष साजरा करत. विराटचा तो आनंद उत्सव साजरा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
https://twitter.com/Pranjal_one8/status/1364527940831174659?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1364527940831174659%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsports.punjabkesari.in%2Fsports%2Fnews%2Fvirat-kohli-celebrates-in-brett-lee-style-after-joe-root-s-wicket-falls-1337815
भारतीय गोलंदाजांनी केली इंग्लंडची वाताहात
अहमदाबाद येथे सुरु झालेल्या या तिसऱ्या दिवस-रात्र स्वरूपाच्या कसोटीत भारताच्या फिरकीपटूंनी इंग्लंड संघाची चांगलीच वाताहत केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला भारतीय गोलंदाजांनी ११२ धावांवर रोखले. भारताकडून आपला दुसरा सामना खेळत असलेल्या अक्षर पटेलने सर्वाधिक सहा बळी मिळवले. अनुभवी रविचंद्रन अश्विनने तीन जणांना तंबूचा रस्ता दाखवला. आपला शंभरावा आंतराष्ट्रीय कसोटी सामना खेळणाऱ्या इशांत शर्माने एक गडी बाद केला.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : विवादित झेलामुळे स्टोक्स होतोय ट्रोल, चाहत्यांनी केली पॉंटिंगशी तुलना
INDvsENG 3rd Test Live: रोहित शर्माचे दमदार नाबाद अर्धशतक, पहिल्या दिवसाखेर भारताच्या ३ बाद ९९ धावा
ईशांत शर्माने उलगडली धोनीसह खेळलेल्या त्या सामन्याची आठवण, भावूक होत म्हणाला