---Advertisement---

खरंच की काय! मुलीच्या जन्मामुळे विराटने ट्विटर बायोमधून हटवला ‘इंडियन क्रिकेटर’ शब्द ?

On: सोमवार, जानेवारी 18, 2021 1:48 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी काही दिवसांपुर्वी छोट्या परीचे आगमन झाले आहे. विराटने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे सर्वांना ही गोड बातमी दिली होती. यानंतर अचानक त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवरील बायोमधून ‘भारतीय क्रिकेटपटू’ हा शब्द हटवल्याचा प्रकार घडला आहे.

विराटच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील बायोमध्ये (स्वत:बद्दल देण्यात येणारी माहिती) पुर्वी भारतीय क्रिकेटपटू, खेळाडू, कारचा चाहता, फुटबॉल आवडणारा आणि सदैव उत्साही, असे लिहलेले होते. परंतु आता बायोमधून हे सर्व शब्द हटवत त्याने ‘अभिमान वाटावा असा पती आणि वडील’, असे लिहले आहे. सोबतच पुढे रेड हार्टचा इमोजी टाकला आहे.

Photo Courtesy: Twitter/ imVkohli

ट्विटर पोस्टद्वारे दिली होती मुलीच्या जन्माची माहिती

विराट आणि अनुष्का यांना ११ जानेवारी रोजी मुलगी झाली आहे. याविषयी माहिती देत विराटने म्हटले होते की ‘आम्हाला सोमवारी दुपारी मुलगी झाली आहे. आम्ही सर्वांनी दिलेल्या प्रेमाचे आणि शुभेच्छांबद्दल आभार मानतो. अनुष्का आणि बाळाचे आरोग्य उत्तम आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील या नवीन पर्वाची सुरुवात करण्यास उत्सुक असून आमच्या खाजगी जीवनाचा आदर राखला जाईव अशी अपेक्षा करतो.’

https://twitter.com/imVkohli/status/1348580955594768385?s=20

काही महिन्यांपूर्वी दिली होती गोड बातमी

विराट आणि अनुष्काने ऑगस्ट २०२० मध्ये सर्वांना नवीन पाहुणा येणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितले होते की, जानेवारी २०२१ मध्ये ते दोघेही पहिल्यांदाच आई-बाबा होणार आहेत.

विराटने घेतली पालकत्व रजा 

विराटने आपल्या बाळाचे आगमन होणार असल्याने पालकत्व रजा बीसीसीआयकडून मंजूर करुन घेतली होती. त्यामुळे तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे, टी२० मालिका आणि कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळून भारतात परतला होता. सध्या तो अनुष्काबरोबर असून त्याने म्हटले होते की, त्याला त्याच्या आयुष्यातील या सुंदर क्षणांचा साक्षीदार व्हायचे आहे. या क्षणांना तो गमावू इच्छित नाही.

इटलीमध्ये झाले लग्न 

विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये १० डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यावेळी त्यांच्या लग्नसोहळ्यात जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवास सहभागी झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या-

विराट कोहली बनला ‘बाप’माणुस; अनुष्काने दिला गोंडस मुलीला जन्म

विराट कोहलीला मुलगी झाल्याचे कळताच रितेश देशमुख यांनी दिली ‘अशी’ प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

‘तुला परत मानला रे ठाकूर’, विराट कोहलीचे ‘मुंबईकर’ शार्दुल ठाकूरसाठी खास ट्विट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---