---Advertisement---

विराटनं महादेवाचं नाव घेत ऑस्ट्रेलियाचा बॅन्ड वाजवला, तर गंभीरनं हनुमान चालिसा ऐकत भारताला पराभवातून वाचवलं!

On: बुधवार, सप्टेंबर 18, 2024 1:30 PM
---Advertisement---

भारत-बांगलादेश कसोटी मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्टार फलंदाज विराट कोहली यांची एक मुलाखत झाली. बीसीसीआय टीव्हीवर ही मुलाखत प्रसारित करण्यात आली आहे. या मुलाखतीत दोघांनीही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. या संभाषणादरम्यान गंभीर आणि कोहली यांनी एक रोमांचक किस्सा सांगितला. त्यांनी आपली फलंदाजी सुधारण्यासाठी ओम नम: शिवाय आणि हनुमान चालिसा मंत्राचा आधार घेतल्याचा खुलासा केला.

विराट कोहलीनं सांगितलं की, तो 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात प्रत्येक चेंडू खेळण्यापूर्वी ओम नम: शिवाय मंत्राचा जप करत होता. तर गंभीरनं सांगितलं की, 2009 मध्ये नेपियर कसोटीदरम्यान त्यानं जवळपास अडीच दिवस हनुमान चालिसा ऐकत फलंदाजी केली आणि भारताला पराभवापासून वाचवलं.

मुलाखतीदरम्यान विराट कोहलीनं गंभीरला प्रश्न केला की, तुमच्यासाठी घरच्या मैदानावर ठोकलेलं द्विशतक खूप स्पेशल असेल. तुम्ही स्वत:ला नियंत्रणात कसं ठेवलं? यावर गंभीरन उत्तर दिलं, “इथे मी तुझ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा उल्लेख करेन. तू त्या दौऱ्यात खूप धावा केल्या होत्या. तू मला सांगितलं होतं की, तू त्या दौऱ्यात प्रत्येक चेंडू खेळण्यापूर्वी ओम नम: शिवाय मंत्राचा जप करत होता. यामुळे तू त्या झोनमध्ये पोहचला. माझ्यासाठी हे अगदी माझ्या नेपियर खेळीप्रमाणे आहे. त्या खेळीदरम्यान मी अडीच दिवस खूप हनुमान चालिसा ऐकली होती. ज्याप्रमाणे तू झोनमध्ये जाण्यासाठी ओम नम: शिवाय मंत्राचा जप करत होता, त्याप्रमाणे मी हनुमान चालिसा ऐकत होतो.”

गौतम गंभीरनं सांगितलं की, या खेळीदरम्यान पाचव्या दिवशी तो 2 तास काहीच बोलला नव्हता. ओव्हर दरम्यानच्या ब्रेकमध्ये देखील त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता. तो ब्रेकदरम्यान मान खाली घालून हनुमान चालिसा ऐकत होता आणि आपल्या झोन मध्ये वापस जात होता.

बीसीसीआयच्या या मुलाखतीत विराट कोहली आणि गौतम गंभीर यांनी एकमेकांशी दिलखुलास चर्चा केली आहे. गेल्या आयपीएल हंगामात या दोघांमध्ये वादावादी झाली होती, ज्यामुळे त्यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याचं बोललं जात होतं. मात्र या मुलाखतीनंतर त्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

हेही वाचा – 

“हिंदूंवर अत्याचार होत असताना परवानगी कशी?” भारत-बांगलादेश मालिकेवर आदित्य ठाकरेंचा सवाल
IND VS BAN: पावसामुळे सामन्यात येणार बाधा! हवामान अंदाजाने चाहत्यांची चिंता वाढली
“5-0 ने बॉर्डर-गावस्कर मालिका जिंकू…” ऑस्ट्रेलियन दिग्गजाने टीम इंडियाला डिवचलं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---