भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ क्रिकेटपटू विराट कोहली याची फॅन फॉलोईंग जगभरात आहे. सध्या तो जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला असे असताना सोशल मीडियावर देखील त्याला फॉलो करणारे करोडो लोक आहेत. नुकतेच एका अहवालात जाहीर करण्यात आले होते की, विराट कोहली हा इंस्टाग्रामवरून मोठी कमाई करतो. करोडोंमधील हा आकडा पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आता याच मुद्द्यावर स्वतः विराटने समोर येत एक ट्विट केले आहे.
अमेरिकेतील एका कंपनीने नुकताच अहवाल सादर केला. यामध्ये एका इंस्टाग्राम पोस्टसाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. या यादीमध्ये फुटबॉलर नेमार याला पछाडत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचल्याचे सांगितले गेलेले. त्या अहवालानुसार विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टची तब्बल 11.45 कोटी इतकी रक्कम घेतो असे सांगण्यात आलेले.
While I am grateful and indebted to all that I’ve received in life, the news that has been making rounds about my social media earnings is not true. 🙏
— Virat Kohli (@imVkohli) August 12, 2023
दोन दिवस याच गोष्टीची चर्चा झाल्यानंतर आता विराटने एक ट्विट केले आहे. यामध्ये त्याने हे आकडे खोटे असल्याचे म्हटले. तो म्हणाला,
“मला आयुष्यात मिळालेल्या सर्व गोष्टींसाठी मी कृतज्ञ आणि ऋणी असलो तरी, माझ्या सोशल मीडियाच्या कमाईबद्दल ज्या बातम्या येत आहेत त्या खर्या नाहीत.”
विराटने दिलेल्या या स्पष्टीकरणामुळे चर्चेला पूर्णविराम लागू शकतो. इंस्टाग्राम हे सध्या सर्वात प्रभावी सोशल मीडिया माध्यम असल्याचे बोलले जाते. जगभरात या माध्यमाचे अब्जावधी खातेधारक आहेत. अनेक जण या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करत पैसे देखील कमावतात. इंस्टाग्राम काही सेलिब्रिटींना पोस्ट करण्याचे पैसे देखील देते.
(Virat Kohli Clarify About His Instagram Per Post Salary Tweeted About It)
महत्वाच्या बातम्या-
“माझ्यासाठी प्रत्येक अपयश ही पुनरागमनाची मजबूत संधी असते” विराटचे लक्षवेधणारे विधान
तिलक आणि यशस्वीच्या खांद्यावर नवी जबाबदारी! प्रशिक्षकांनीच केला खुलासा