---Advertisement---

विराटचे दिवस-रात्र कसोटीत शतक पूर्ण; असा विक्रम करणाराही बनला पहिलाच भारतीय

On: शनिवार, नोव्हेंबर 23, 2019 2:31 PM
---Advertisement---

कोलकाता। कालपासून (22 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात इडन गार्डन्स स्टेडियमवर दिवस-रात्र कसोटी सामन्याला(Day-Night Test) सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीने(Virat Kohli) शतकी खेळी केली आहे.

विराटने 159 चेंडूत 12 चौकारांसह आज शतक पूर्ण केले आहे. त्यामुळे तो दिवस-रात्र कसोटीमध्ये शतक करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. तसेच त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील 27 वे शतक(27th Test Century) आहे.

त्याचबरोबर त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 70 वे शतक आहे. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 शतके करणारा केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.

याआधी केवळ मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि रिकी पॉटिंग यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 70 किंवा त्यापेक्षा अधिक शतके केली आहेत. सचिनने 100 शतके केली आहेत. तर पॉटिंगने 71 शतके केली आहेत.

कालपासून चालू झालेल्या दिवस-रात्र कसोटीत बांगलादेशचा पहिला डाव 106 धावांवर संपूष्टात आला आहे. तर भारताने पहिल्या डावात विराटच्या शतकी खेळीच्या जोरावर 250 धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराटने या डावात उपकर्णधार अजिंक्य रहाणेबरोबर चौथ्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी केली आहे. पण रहाणे 51 धावांवर बाद झाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे फलंदाज – 

100 शतके – सचिन तेंडूलकर

71 शतके – रिकी पॉटिंग

70 शतके – विराट कोहली

63 शतके – कुमार संगकारा

62 शतके – जॅक कॅलिस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---