भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी (23 ऑक्टोबर) मेलबर्न येथे खेळल्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) याने अनेक विक्रम रचले. आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतकांच्या यादीत विराटने सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याला मागे सोडले. विराटने आयसीसी स्पर्धेत 24 अर्धशतके ठोकून सचिनच्या 23 अर्धशतकांचा विक्रम मोडून काढला. त्याने विश्वचषकात एकाचं संघाविरूद्ध सर्वाधिक वैयक्तिक धावा केल्या. विश्वचषकात त्याने पाकिस्तान विरुद्ध 501 धावा करत एबी डिवीलियर्स (AB De Villiers) याचा वेस्ट इंडीजविरूद्धचा 458 धावांचा विक्रम तोडला. त्याचबरोबर विराटने आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
विराटच्या विक्रमांच्या यादीत आणखी एक पान जोडलं गेलं आहे. त्याने भारताबाहेर मैदानावर खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये 500 पेक्षा जास्त धावा केल्या. परकीय भूमीवर असा पराक्रम करणारा तो पहिलाच भारतीय आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियामध्ये खेळलेल्या 11 डावांमध्ये 146 च्या स्ट्राइक रेटने 533 केल्या आहेत. ज्यात त्याच्या धावांची सरासरी 76.14 अशी होती.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या टी20 विश्वचषकाच्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी उतरलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर कर्णधार बाबर आझम ( Babar Azam) शून्यावर बाद झाला, त्या पाठोपाठ मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) देखील तबूंत परतला. त्यानंतर इफ्तिखार अहमद ( Iftikhar Ahmad) आणि शान मसूद (Shan Masood) यांनी डाव सावरला. या डावात इफ्तिखारने 34 चेंडूत 2 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 51 धावा केल्या. तर शानने 42 चेंडूत 5 चौकारांच्या सहाय्याने 52 धावा केल्या. पाकिेस्तानने 8 गडी गमावतं 159 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात खूपचं खराब झाली. केएल राहुल आणि रोहित शर्मा स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या यांनी संयम राखत संथ गतीने धावसंख्या सूुरू ठेवली. विराटचा यामध्ये मोलाचा वाटा होता. त्याने 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या बळावर 82 धावा केल्या आणि भारताचा विजयाच मार्ग मोकळा केला. त्याच्या याचं प्रदर्शनामुळे तो ऑस्ट्रेलियात विक्रमांच्या शिखरावर विराजमान झाला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम
अस कस घडल! विराट पाकची पिसे काढत असताना बिघडली भारताची अर्थव्यवस्था; वाचा संपूर्ण प्रकरण