टी20 विश्वचषकात (T20 World Cup) सोमवारी (24 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिका विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात सुपर 12चा 18वा सामना खेळला गेला. हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांनी गुण वाटून घेतले. हा सामना प्रत्येकी 9-9 षटकांचा सामना खेळला गेला. होबार्टमध्ये झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 80 धावांचे लक्ष्य मिळाले होते. पहिल्याच षटकात क्विंटन डी कॉक याने एवढ्या धावा चोपल्या की त्याने वर्ल्ड रेकॉर्ड्सच आपल्या नावावर केले आहेत.
क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याने झिम्बाब्वे विरुद्ध पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. दुसऱ्या चेंडूवरही चौकार ठोकला आणि तिसऱ्या चेंडूवर चौकाराची हॅट्र्टीक पूर्ण केली. त्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने षटकार खेचला आणि पाचव्या चेंडूला पुन्हा सीमारेषेवर पाठवत चार धावा मिळवल्या. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेतली. अशाप्रकारे डी कॉकने पहिल्या षटकात एकूण 23 धावा कुटल्या. जो एक विक्रम ठरला आहे. त्याने एकाच संघाकडून खेळताना एक खेळाडू म्हणून टी20 विश्वचषकाच्या सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
चकित करणारी बाब म्हणजे क्विंटनचा हा प्रवास पुढच्या षटकातही सुरूच राहिला. त्याने दुसऱ्या षटकातही त्याने सगळे चेंडू खेळताना चार चौकार मारले. यामुळे त्याने दुसऱ्या षटकात 16 धावा केल्या. यामुळे त्याच्या 2 षटकात 39 धावा झाल्या. याबरोबरच तो आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये एका डावात 2 षटकांनंतर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या करणारा फलंदाज ठरला. त्याच्याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा डेविड वॉर्नर याच्या नावावर होता. त्याने 2010मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या दोन षटकात 33 धावा केल्या होत्या. Highest individual score after first 2 overs in T20I innings
या सामन्यात डी कॉकने केवळ 18 चेंडूत नाबाद 47 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 8 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. टी20 विश्वचषकातच्या इतिहासात पाहिले तर 2016 मध्ये इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 21 धावा केल्या होत्या. त्याआधी 2009च्या स्पर्धेत न्यूझीलंडने स्कॉटलंडविरुद्ध 19 धावा केल्या होत्या. या सर्व विक्रमांना दक्षिण आफ्रिकेने मागे टाकले आहे. Most runs in the first over of a T20 World Cup match
टी20 विश्वचषकातील सामन्याच्या पहिल्या षटकात सर्वाधिक धावा-
23 – दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे, होबार्ट 2022
21 – इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका, मुंबई 2016
19 – न्यूझीलंड वि. स्कॉटलंड द ओव्हल 2009
आंतरराष्ट्रीय टी20च्या डावातील पहिल्या 2 षटकांनंतर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या:
39 – क्विंटन डी कॉक वि. झिम्बाब्वे 2022
33 – डेविड वॉर्नर वि. वेस्ट इंडिज 2010
33 – निकोलास डेव्हिन वि. बर्म्युडा, 2019
32 – मोहम्मद शहजाद वि. दक्षिण आफ्रिका, 2016
32 – जॉर्ज मुनसे वि. नेदरलॅंड्स , 2019
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकापेक्षा टी-20 विश्वचषकात भारत-पाक सामना पाहणाऱ्यांची संख्या वाढली, मोडीत निघाले सर्व विक्रम
अस कस घडल! विराट पाकची पिसे काढत असताना बिघडली भारताची अर्थव्यवस्था; वाचा संपूर्ण प्रकरण