वेस्ट इंडीज आणि भारत यांच्या दरम्यान डोमिनिका येथे पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. दुसऱ्या दिवशीचा नाबाद शतकवीर यशस्वी जयस्वाल हा दीडशतकी खेळी करून बाद झाल्यानंतर अनुभवी विराट कोहलीने संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. यादरम्यान त्याने अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा एक मोठा विक्रम मोडीत काढला.
दुसऱ्या दिवशी 36 धावांवर नाबाद असलेल्या विराटने तिसऱ्या दिवशी आपला डाव सुरू केला. त्याने अर्धशतकी मजल मारताना भारतीय संघाला सुस्थितीत पोहोचवले. कसोटी क्रिकेटमधील हे त्याचे 30 वे अर्धशतक ठरले. याबरोबरच राहुल द्रविड यांचा एक विक्रम आपल्या नावे केला.
विराटच्या नावे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विदेशात खेळताना 88 व्या वेळी पन्नास पेक्षा जास्त धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मागे सोडले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 87 वेळा ही कामगिरी केली होती. भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विदेशात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा जास्त धावा करण्याचा मान सचिन तेंडुलकर यांच्या नावे असून त्याने आपल्या कारकीर्दीत 96 वेळा हा कारनामा केलेला.
विराटच्या या खेळीबद्दल बोलायचे झाल्यास, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा विराटने 73 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सत्रात त्याच्याकडे आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 76 वे शतक करण्याची संधी असेल. तिसऱ्या दिवशी लंचसाठी खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने 4 बाद 400 धावा केल्या असून, भारताकडे 250 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी आहे.
(Virat Kohli Complete 88 Overseas 50 Plus Score In International Cricket Surpass Rahul Dravid)
महत्वाच्या बातम्या –
दक्षिण विभाग दुलीप ट्रॉफी विजयाच्या दिशेने! कवीरप्पाच्या 7 बळींनी मोडले पश्चिम विभागाचे कंबरडे
BREAKING । भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची घोषणा! डिसेंबर-जानेवारीत तीन मालिकांचे आयोजन