---Advertisement---

रोहितची दुखापत ‘या’ फलंदाजाच्या पडली पथ्यावर; विराट शिक्कामोर्तब करत म्हणाला, ‘मयंकसोबत तो सलामी..’

virat-kohli-test
---Advertisement---

भारतीय संघाला आगामी काळात दक्षिण अफ्रिका दौऱ्यात (south africa tour of india) कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. भारतीय संघ १६ डिसेंबरला या दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेत पोहोचला आहे, पण रोहित शर्मा (rohit sharma) यावेळी संघात सामील नाही. रोहितला सरावादरम्यान दुखापत झाली होती आणि याच कारणास्तव त्याने कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. अशात रोहितच्या अनुपस्थितीत मयंक अगरवालसोबत कोणता खेळाडू सलामीसाठी येणार? याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु कर्णधार विराट कोहली (virat kohli) याने याबाबत स्पष्टीरकण दिले आहे.

दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने रोहितकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद आणि कसोटी संघाचे उपकर्णधारपद सोपवले गेले होते. पण दुखापतीमुळे तो कसोटी मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. बुधवारी (१५ डिसेंबर) विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेत कसोटी मालिकेत कोणता खेळाडू रोहितची जागा घेईल? याबाबत स्पष्टीकरण दिले.

विराटने यावेळी सांगितले की, दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत मयंक अगरवाल केएल राहुलसोबत डावाची सुरुवात करेल. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून सेंचुरीयनमध्ये खेळला जाणार आहे

रोहित शर्माला जेव्हापासून एकदिवसीय संघाचे कर्णधार बनवले गेले, तेव्हापासून विराट आणि रोहित यांच्यातील वादाविषयी चर्चा होत आहे. विराटने यावेळी बोलताना हेदखील सांगितले की, त्याच्यात आणि रोहितमध्ये कसलाही संघर्ष नाही. तो म्हणाला की, ‘मी ही गोष्ट मागच्या दोन वर्षांपासून सांगत आहे आणि आता याविषयी स्पष्टीकरण देऊन थकलो आहे.’ दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिकेत रोहित शर्माची कमतरता जाणवेल असेही विराट म्हणाला.

तत्पूर्वी रोहित शर्मा मुंबईत सराव करताना दुखापतग्रस्त झाला होता, परिणामी त्याला कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतून त्याने माघार घेतली असली तरी एकदिवसीय मालिकेत मात्र तो पुनरागमन करेल अशी शक्यता आहे.  रोहितसाठी एकदिवसीय संघाच्या नियमित कर्णधाराच्या रूपात ही त्याची पहिलीच मालिका असणार आहे.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी निवडलेला कसोटी संघ –
विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, ऋद्धिमान साहा, रविचंद्रन अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, प्रियांक पांचाल.

महत्वाच्या बातम्या –

‘ऍशेस’ गाजवत असलेल्या वॉर्नरने गाठला विराट, कसोटी क्रमवारीत केली बरोबरी; स्टोक्सच्या हाती मात्र निराशा

धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिका लायकची आत्महत्या, गेल्या ४ महिन्यांतील चक्क चौथी घटना

दक्षिण आफ्रिका क्रिकेटला गालबोट, डिविलियर्स, स्मिथसारख्या दिग्गज खेळाडूंवर गंभीर आरोप

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---