भारतीय संघाच्या (team india) इतिहासात जेव्हा कधी महान खेळाडूंचा उल्लेख केला जाईल, तेव्हा विराट कोहली (virat kohli) याचे नाव त्यामध्ये नक्कीच येईल. शनिवारी (१५ जानेवारी) विराटने भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराट मैदानावरील त्याच्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो. भारतीय संघासाठी तो आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याने ४० कसोटी सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. असे असले तरी, कर्णधारपदाच्या कार्यकाळात त्याने असे काही निर्णय घेतले होते, ज्यामुळे तो टीकाकारांच्या निशाण्यावर आला होता. आपण या लेखात त्याचा याच चुकीच्या निर्णयांविषयी माहिती घेणार आहोत.
१. विश्वचषक स्पर्धेत विजय शंकरला संधी दिली
आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये भारतीय संघात विजय शंकरला संधी दिली गेली होती. कर्णधार विराटमुळे त्याला विश्वचषकाच्या संघात संधी मिळाल्याचे सांगितले गेले होते. तर अंबाती रायडूला मात्र फॉर्ममध्ये असताना देखील विश्वचषकात खेळण्याची संधी मिळाली नाही. विजय शंकरला एकदिवसीय आणि टी२० संघात पदार्पणाची संधी देखील विराटच्याच कर्णधारपदामध्ये मिळाली होती. विराटने विजयला संधी दिली खरी, पण तो विश्वचषक स्पर्धेत तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. याच पार्श्वभूमीवर विराटच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. विश्वचषकात न्यूझीलंडकडून भारताला उपांत्य सामन्यात पराभव मिळाला होता.
२. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दोन फिरकी गोलंदाजांना खेळवले
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून ८ विकेट्सने पराभव मिळाला होता. हा सामना साउथहॅमप्टनच्या मैदानावर खेळला गेला होता. या मैदानावर नेहमीच वेगवान गोलंदाजांना फायदा मिळत आला आहे. परंतु, कर्णधार विराटने अंतिम सामन्यात रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोन फिरकी गोलंदाजांना खेळलवे होते. या दोघांनी या सामन्यात काही खास प्रदर्शन केले नव्हते. सामन्यातील दोन्ही डावांमध्ये या दोघांनी मिळून अवघ्या पाच विकेट्स घेतल्या होता. विरोधी संघाने या दोघांची चांगलीच धुलाई केली होती. अंतिम सामन्यात या दोघांना खेळवल्यामुळे विराटवर अनेकांनी टीका केल्या होत्या.
३. खराब फॉर्ममधील पुजारा आणि रहाणेला वारंवार संधी दिली
भारतीय संघाचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉर्मशी झगडत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या दोघांनी एकदाही शतकी खेळी केली नाहीय. परंतु तरीही विराट त्यांचे समर्थन करत असल्यामुळे हे दोघे संघात कायम आहेत. या दोघांच्या ऐवजी भारतीय संघाकडे चांगल्या फॉर्ममधील इतर खेळाडू असतानाही यांना एकापाठोपाठ संधी मिळत आहे. श्रेयस अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध त्याच्या पदार्पण सामन्यात शतक केले होते, तरीही त्याला संघात संधी मिळण्यासाठी वाट पाहावी लागत आहे. तसेच हनुमा विहारीसारखा दमदार फलंदाज देखील संधीची वाट पाहत आहे. पुजारा आणि रहाणेला वारंवार संधी दिल्यामुळे विराटवर नेहमीच टीका होत आल्या आहेत.
४. टी२० विश्वचषक २०२१ मध्ये संघाचा फलंदाजी क्रम बदलला
२०२१ मध्ये इतिहासात पहिल्यांदा पाकिस्तानने भारताला विश्वचषक स्पर्धेत पराभूत केले. मागच्या वर्षी टी२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानने एकही विकेट न गमावता भारतीय संघाला धूळ चारली होती. या सामन्यात विराटने सूर्युकमार यादवच्या जागी इशान किशनला संघात सामील केले होते. इशान किशनला न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या जागी डावाची सुरुवात करायला पाठवले गेले होते, परंतु तो स्वस्तात विकेट गमावून बसला. याच कारणास्तव भारताला सामन्यात लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला होता. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
महत्वाच्या बातम्या –
जाता जाता ‘या’ ५ खेळाडूंची कारकीर्द घडवून गेला विराट, एकटा आता घेऊ पाहतोय त्याचीच जागा!
कोहलीला ‘सेंच्यूरी किंग’ न बनण्याचा नेहमीच राहणार मलाल! पाँटिंगच्या बड्या विक्रमांना मात्र ‘जीवनदान’
कर्णधार म्हणून कोहलीची कारकीर्द ‘विराट’च, पण त्याचे ‘हे’ वाद नेहमीच राहणार चर्चेत
व्हिडिओ पाहा –